Auto drivers protest in Mumbai over Marathi language mandate, tensions escalate. saam tv
मुंबई/पुणे

मराठी सक्तीविरोधात परप्रांतीयांची मुजोरी, मराठी रिक्षाचालकही आक्रमक

Maharashtra Language Controversy: रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा सक्ती केल्यामुळे हा वाद सुरू झाला आहे. परप्रांतीय रिक्षाचालकांनी या निर्णयाविरोधात संपाची हाक दिलीय. यानंतर मराठी रिक्षाचालक आक्रमक भूमिका घेतली आहे.

Suprim Maskar

महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी सक्ती करण्यात आल्यानंतर परप्रांतीय रिक्षाचालकांची मुजोरी आता समोर येऊ लागलीय. परप्रांतीय रिक्षाचालकांनी या निर्णयाविरोधात संपाची हाक दिलीय. मात्र रिक्षाचालकांचा हा माज नेमका कसा वाढला? मराठी रिक्षाचालकांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलयं?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ज्या मुंबईनं परप्रांतीयांना सामावून घेतलं,पोटापाण्यासाठी रोजगार दिला. रहायला छप्पर दिलं . त्याचं मुंबईत 'मराठी' भाषेच्या सक्तीवरून परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी- चालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आलीय. मराठी सक्तीचा निर्णय धुडकावून या रिक्षाचालकांनी 4 मे ला संपाची हाक दिलीय..मात्र या मराठीद्वेष्ट्या रिक्षा चालकांचा माज उतरवण्यासाठी मराठी रिक्षाचालकही मैदानात उतरलेत.

दुसरीकडे मराठी बोलणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांवर “मला मराठी येते, मला मराठी समजते” असे स्टिकर लावत मराठी रिक्षाचालकांची मोट बांधण्याची सुरुवात झालीय. तसचं ज्या राज्यात व्यवसाय करता, तिथली भाषा शिकायला वावडं का? असा सवालही मराठी भाषिकांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान या मराठीद्वेष्ट्या रिक्क्षाचालकांच्या संपावरून ठाकरेसेना आणि मनसेनंही आक्रमक झालीय.

रिक्षाचा संप ठाकरेंचा विरोध

दुसरीकडे मराठी एकीकरण समितीनंही परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनाला आंदोलनाने उत्तर देण्याचा इशारा दिलाय. परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणारी प्रवाश्यांची होणारी लूट साम investigation मधून समोर आणली होती. पोटापाण्यासाठी येऊन रोजगार करायचाय. मात्र मराठी भाषा शिकायची नाही,हा माज नेमका येतो कुठून? यहा पे चलता है..हा मुजोरपणा खपवून घेतला जातो म्हणून हा मस्तवालपणा येतो का ? याचा जाब तर विचारायला हवाच. पण सरकारंनही ठाम राहून केवळ राजकारण समोर ठेवून असे निर्णय़ न घेता आपल्या नियमावर ठाम राहणंही तेवढंच गरजेच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Model Death : फॅशन इंडस्ट्रीत खळबळ! फोटोशूट करताना काळाने घात केला, प्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी मृत्यू

End of life symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा मृत्यू जवळ आलाय!

Shocking : बीड हादरलं! २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या; कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण

आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

Maharashtra News Live Update: छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT