Raj Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Marathi Bhasha Din 2023 : ...त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी; राज ठाकरेंनी घातली मराठी भाषिकांना साद

Marathi Bhasha Gaurav Diwas: आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषा प्रेमी एकमेकांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी पत्र ट्विट करून मराठी भाषिकांस शुभेच्छा दिल्या आहेत. 'व्यवहारात मराठी ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला. त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी, अशी साद राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना घातली. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रात लिहिले आहे की, ' कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती'.

'पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

'असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी (Marathii), दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, 'मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण 'मराठी एकत्र' असू तर 'सर्वत्र मराठी' करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT