Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरू होत आहे. राज्यात सत्तापालथ झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.
Maharashtra Budget Session
Maharashtra Budget Session Saam TV
Published On

Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरू होत आहे. राज्यात सत्तापालथ झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Budget Session
Pandharpur Accident : भरधाव कार थेट दुकानात घुसली; आजीसह ५ वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

राज्य विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंचत चालणार आहे. ८ मार्च रोजी अर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. बजेटवर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. अधिवेशनात एकूण १३ विधेयके मांडली जाणार असून विधान परिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे.

आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

Maharashtra Budget Session
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; दोन वेगवेगळ्या अपघातात ५ गंभीर जखमी

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढा, असे आदेश महाविकास आघाडीच्या आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जुनी पेन्शन योजना, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे, पाळत प्रकरण आणि हल्ल्यांचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी 14 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, यावरून सुद्धा अधिवेशनात पडसाद उमटू शकतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com