Sonali Kulkarni
Sonali Kulkarni Saam tv
मुंबई/पुणे

Sonali Kulkarni: 'माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी...'; सोनाली कुलकर्णीने दिला जुन्या आठवणींना उजाळा

जयश्री मोरे

Sonali Kulkarni News: 'माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मी बालकल्याणमध्ये केली. ही संस्था प्रतापराव पवार आणि भारती पवार यांची आहे. मला पहिलं वेतन त्यांच्याकडून मिळालेलं आहे, असं म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणारा महाराष्ट्रातील कर्तबगार उद्योजक व्यावसायिकांचा सकाळ माध्यम समूहातर्फे विशेष सन्मान आज मुंबईत होत आहे. कार्यमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित दर्शवली.

सकाळ समूहाच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी म्हणाली, 'माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मी बालकल्याणमध्ये केली आहे. माझ्या हक्काचा 'पॉकीट मनी' बालकल्याणने दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत १८ वर्षे काम केलं. आयुष्यात कितीही पुरस्कार मिळाले, यश मिळाले, तरी जोपर्यंत सकाळमध्ये बातमी येत नाही, तोपर्यंत मजा येत नाही. तसेच आपण काही साध्य केले, जिंकले असे वाटत नाही'. (Latest News)

'मी जेव्हा मुंबईत नवीन होते. तेव्हा छोट्याशा घरात भाडेतत्वावर राहत होते. तेव्हा मला फोन आला. तो सुलोचनाताईंचा फोन होता. आज महा ब्रँड होण्यापूर्वी आपण सगळेच कुठेतरी स्ट्रगल करत असतो. आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींकडे सकाळ परिवाराचं लक्ष असतं, असं सोनाली पुढे म्हणाली.

'आपण प्रतिनिधी म्हणून आलो आहे. आपल्या प्रत्येकाच्या मागे आपली टीम असते. संच असतात. आपण टीममुळेच भक्कम उभे राहतो. ब्रँड हे आपल स्वप्न असतं. सकाळचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला आज आमंत्रित केलं, हा महत्त्वाचा सोहळा आहे, असं सोनाली कुलकर्णी शेवटी म्हणाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

SCROLL FOR NEXT