MAHESH KOTHARE CALLS HIMSELF BJP AND MODI BHAKT, SAYS kamal WILL BLOOM IN MUMBAI saam TV Marathi News
मुंबई/पुणे

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Mahesh Kothare statement ahead of BMC elections : मराठी अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. “मी मोदींचा भक्त आहे, मुंबईत कमळ फुलणारच” असं वक्तव्य त्यांनी केलं.

Namdeo Kumbhar

Marathi actor Mahesh Kothare on BJP and PM Modi : मी भाजपाचा भक्त आहे, मोदींचा भक्त आहे, मुंबईत कमळ फुलणार, असा विश्वास मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केले आहे. मागाठाणे येथे एका कार्यकर्मात ते बोलत होते. यावेळी बोलताना महेश कोठारे यांनी भाजप अन् मोदींचे तोंडभरून कौतुक केले. पुढील काही दिवसांत राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. निवडणुकीचे राज्यात बिगुल वाजले असतानाच कोठारे यांनी केलेले हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई मनपासाठी एकमेकांना टाळी दिली आहेच. तर दुसरीकडे भाजप-शिवसेना अन् राष्ट्रवादीने आपली एकत्र ताकद लावली आहे. मुंबईसाठी ठाकरे अन् भाजप महायुती यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार असल्याचे निश्चित झालेय. मुंबईवर कुणाचा झेंडा फडकणार? याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ महामुंबईसह राज्यात सुरू आहे. त्यातच मराठी अभिनेते अन् दिग्दर्शक,निर्माते महेश कोठारे यांनी भाजप, मोदी अन् शिंदेंबाबत मोठं विधान केलेय. मुंबईमध्ये भाजपचे कमळ फुलणारच, असा विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केला आहे.

ठाण्यातील मागाठाणे येथे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला महेश कोठारे यांना आमंत्रित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, प्रवीण दरेकर यांच्यासह महेश कोठारे उपस्थित होते. या कार्यक्रमात कोठारे यांनी भाजपचं कौतुक केले. ते म्हणाले की, "भाजपा म्हणजे आपलं घरच आहे, कारण मी भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे." महेश कोठारे यांचं हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. महेश कोठारे राजकारणात प्रवेश करणार आहेत काय? असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महेश कोठारे नेमकं काय म्हणाले ?

मी भाजपाचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहे. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT