Parvez Rasool: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसलाय. टीम इंडिया कमबॅकची तयारी करत असतानाच जम्मू-कश्मीरमधील परवेज रसूल याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. रसूल टीम इंडियाकडून खेळणारा पहिला काश्मीरी खेळाडू ठरला होता. सुरैश रैनाच्या नेतृत्वातील टीम इंडियात त्याने पदार्पण केले होते. त्याशिवाय धोनीच्या नेतृत्वात पुणे संघाचा सदस्य राहिलाय.
जम्मू काश्मीर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रसूल पहिला काश्मीरी खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा रसूल पहिला काश्मीरचा खेळाडू ठरला. ३६ वर्षीय रसूल याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. रसूल याने सोशल मीडियावर याबाबतची घोषणा केली आहे. त्याने आपण निवृत्त होत असल्याची माहिती बीसीसीआयला दिली आहे. रसूल याने १७ वर्षे देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली.
रसूल याने १७ वर्षात अष्टपैलू कामगिरीने काश्मीरसाठी धावांचा पाऊस पाडला अन् विकेट घेतल्या. त्याने काश्मीरसाठी ३५२ विकेट अन् ५६४८ धावांचा पाऊस पाडला. टीम इंडियासाठी रसूल फक्त दोन सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी कऱणाऱ्या रसूल याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवता आला नाही. रसूल याने टीम इंडियासाठी एक वनडे आणि एक टी २० सामना खेळला. दरम्यान, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वश्रेष्ठ अष्टपैलू म्हणून दोन वेळा लाला अमरनाथ ट्रॉफीने गौरवण्यात आले.
२०१२-१३ च्या देशाअंतर्गत हंगामात रसूलने जम्मू काश्मीरसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्या हंगामात गोलंदाजी अन् फलदाजीत सर्वोत्कृष्ट योगदान दिले. त्याने एका हंगामात ५९४ धावा केल्या आणि ३३ बळी घेतले. या कामगिरीच्या बळावर त्याने भारतीय संघात स्थान पटकावले. आयपीएलमध्येही त्याला संधी मिळाली. रसूल याला पुणे वॉरियर्सने ताफ्यात घेतले होतो. रसूल आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.