Maratha Reservation: जे काही व्हायचे तो होवो, उपोषण करणारच - छत्रपती संभाजीराजे SAAM TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: जे काही व्हायचे ते होवो, उपोषण करणारच - छत्रपती संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती हे आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ते उपोषण करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: खासदार संभाजीराजे छत्रपती हे आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ते उपोषण करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करणार आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आज उपोषणाच्या आधी पत्रकार परिषद घेत उपोषण जे काही व्हायचे तो होवो, उपोषण करणारच असा इशारा दिला आहे.

यावेळी ते म्हणाले, "आपण मराठ्यांची बाजू भक्कम का घेता? मला सांगायचं आहे, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्वप्न पाहिले ते फक्त मराठ्यांना घेऊन नाही तर. त्यांनी १८ पगड जाती ना घेऊन केलं. त्यानंतर नंतर शाहू महाराजांनी पाहल्यांदा बहुजन समजला आरक्षण दिले. त्यानंतरबाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ५०% सुद्धा केलं. ह्यात अनुसूचित जाती जमाती ओबीसी होते, यात मराठा समाजच देखील समावेश होता. मी मराठा म्हणून नाही तर बहुजन समाज या सगळ्यांना एक छता खाली कस आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. हा गरीब मराठ्यांसाठी लढा आहे. यांना आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही म्हणून हे आंदोलन आहे. मी महाराष्ट्र पिंजून काढला."

पुढे ते म्हणाले, "२००७ पासून महाराष्ट्रात फिरत आहे. आरक्षण मिळाले पण टिकले नाही. २०१७ आझाद मैदान आंदोलन केलं. तेव्हा स्टेजवर जाऊन मी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर लोक परत गेले. SEBC आरक्षण मिळाले पण टिकले नाही. सर्वोच नायायालयाने ते रद्द केले," असे म्हणत संभांजीराजेंनी नाराजी व्यक्त केली.

हे देखील पहा-

ते म्हणाले, "राज्याची जबाबदारी होती review petition दखल करणे. मला लक्षात आरक्षण दीर्घ कालीन प्रक्रिया आहे. पण तोपर्यंत गरीब समाजाने काय करायचे? त्यातही मागण्या आहेत. मग पुन्हा आंदोलन झाले. १६ जूनला कोल्हापुरात मुक आंदोलन झाले. त्यानंतर आम्हाला १७ जूनला ताबडतोब सरकारने बोलवले. आम्ही केवळ आमच्या ५ ते ६ मागण्या घेऊन गेलो होतो. त्यावेळी सर्व नेते आमच्या समोर होते. सर्वांसमोर त्यांनी सांगितलं १५ दिवसात मागण्या पूर्ण करतो. पण आम्ही सांगितल दोन महिने घ्या. पण काही झालं नाही. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता जे काही होईल ते होईल उपोषण करू," असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांविषयी बोलताना आमदार सदाभाऊ खोत धाय मोकलून रडले|VIDEO

Maharashtra Politics: महायुतीमध्ये ठिणगी! जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यात खडाजंगी

Ganpati Rangoli : कमी रंगात सुंदर रांगोळी, नवी क्रिएटिव्ह आयडिया

SCROLL FOR NEXT