Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, पीएम नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, लाडकी बहीण योजना अपडेट, गणेशोत्सवाची तयारी, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाव या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील दोन वर्षापासून आंदोलन करीत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सात वेळा आमरण उपोषण केले असून एकदा मुंबई वारी देखील केली आहे.

आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला आंदोलन करणार आहे.

त्यासाठी मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून 29 ऑगस्टला ते मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे.

सांगोल्यात लांडग्यांचा धुमाकूळ, लांडग्यांचा 9 जणांवर हल्ला

जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू...

सांगोल्याच्या धायटी,एकतपूर,चिंचोली परिसरात

लाडग्यांची दहशत....

लाडग्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी ...

वन विभागाकडून लाडग्याच्या शोध सुरू...

Nashik: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यू

गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यू

गोसीखुर्द धरणाच्या बेलघाटा जवळील उजव्या कालव्यात चितळ पडलं होतं.

याची माहिती मिळताचं पवनी वन विभागाच्या RRT पथकानं कालव्याच्या खोल पाण्यात उतरतं चितळाचं मोठ्या अथक प्रयत्नांनं सुखरूप रेस्क्यु केलं.

सध्या गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं कालव्याच्या प्रवाहित पाण्यात उतरून चितळाचं रेस्क्यू करताना मोठी अडचण निर्माण होत होती.

मात्र, RRT पथकं आणि वन कर्मचाऱ्यांनी चितळ सुखरूप बाहेर काढून त्याला वन अधिवासात सोडलं.

Nashik: शॉर्ट सर्किटमुळे ई- सेवा केंद्राला आग लागून कागदपत्रे जळून खाक

नाशिकच्या बागलाणमधील करंजाड येथील शिवराय कम्प्युटर अँड महा ई सेवा केंद्र चालवणाऱ्या हर्षल भामरे यांच्या केंद्रात मध्य रात्रीच्या सुमारास शर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली असून या आगीत केंद्रातील संपूर्ण साहित्य, कागदपत्रे या सह अन्य मशनिरी साहित्य जळून खाक होऊन भामरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,विशेष म्हणजे 5 ते 6 गावातील नागरिकांना या ई सेवा केंद्राचा मोठा आधार होता. मात्र ते संपूर्णतः जळून गेल्याने परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Nagpur: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू 

नागपूर -

- नागपूरच्या भिवापूरात भरधाव कारच नियंत्रण सुटून भीषण अपघात, मरु नदीच्या पुलावरून 35 ते 40 फूट खाली कार नदीपात्रात पडून अपघात..

- सकाळी 8 वाजताच्या सुमारास नीरजकडून उमरेडला जातांना वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज...

- यात सागर वाघमारे अस तरुणाचा नाव आहे, चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती.

Konkan: रत्नागिरी- कोकणात गणेशोत्सवासाठी कोंकणवासी येण्यास सुरुवात

रत्नागिरी- कोकणात गणेशोत्सवासाठी कोंकणवासी येण्यास सुरुवात

कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोंकणवासी कोकणात दाखल

तीन दिवस अगोदरच कोंकणवासी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल

गणपतीच्या स्वागतासाठी लाखो कोंकणवासी कोकणात

कोकणवासीयांना गणेशोत्सव आगमनाचे लागले वेध

गणपती स्पेशल ट्रेन ने कोकणवासी कोकणात दाखल

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325 हून अधिक फेऱ्या

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन

कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल

सहा ते सात लाख भाविक गणेशोत्सव ट्रेनने येणार गणेशोत्सवासाठी कोकणात

अनेक ट्रेन उशिरा धावत असल्याने तसेच बुकिंग तिकीट वरून उडणाऱ्या गोंधळावर कोंकणवासियांची नाराजी

Nashik: नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

नाशिक -

- नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला केलेले मारहाण प्रकरण

- मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक मराठी नागरिकांवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

- जय भवानी रोड परिसरात शुक्रवारी सायंकाळी वैद्यनाथ पंडित यांना करण्यात आली होती मारहाण

- गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झाला होता वाद

Ahilyanagar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर, संगमनेरमध्ये रोड शो आणि आभार सभा

अहिल्यानगर -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर

आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन

संगमनेरमध्ये रोड शो आणि आभार सभा

दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शिंदे पोहचणार संगमनेरमध्ये

काही दिवसांपूर्वी कीर्तनात झालेल्या राड्यानंतर आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप प्रत्यारोप

आरोप प्रत्यारोपाणे राजकीय वातावरण तापले

एकनाथ शिंदे आजच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्यावर काही बोलणार का? याकडे लक्ष...

Junnar: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती दिनानिमित्ताने गि-हारोहकांनी गडकिल्यांवरुन दिली सलामी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्ग नांदगीरवाडी, अंतुर, सुतोंडा, लोंझा आणि पेडका या पाच दुर्गांना दोन दिवसांत ३२ किलोमीटरची पायपीट करीत सर करीत पुण्याच्या टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भारतीय तिरंगा ध्वज फडकावित "हुतात्मा राजगुरू अमर रहे", "भारत माता की जय", "वंदे मातरम" या घोषणा देत हुतात्मा राजगुरूंना वंदन केले.

Solapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा

सोलापूर -

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना

- सोलापूर ते अयोध्या, मथुरा, काशी आदी तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरला परतणार आहेत

- मोहोळ तालुका भाजपच्यावतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आलेय

- यावेळी भाविकांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला

Pune: अष्टविनायकांपैकी रांजणगाव महागणपतीच्या महाद्वार यात्रेची सुरूवात

अष्टविनायकांपैकी रांजणगाव महागणपतीच्या महाद्वार यात्रेची सुरूवात

आज पहाटे तीन वाजता झालेल्या महापूजा-आरतीनंतर भाविकांसाठी रांजणगाव महागणपतीच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले

याचसोबत भाद्रपद द्वार यात्रा उत्सवाची सुरुवात झाली.

Pune: शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर? द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनाला लावणार हजेरी

पुणे -

शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर?

पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशनाला दोघे नेते एकत्र येणार?

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान सुद्धा राहणार उपस्थितीत

पिंपरी चिंचवड मधील हॉटेल मध्ये अधिवेशनाचे आयोजन

सकाळी १० वाजता अधिवेशनाला होणार सुरुवात

Yavatmal: आवाजाची मर्यादा पाळत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा, पोलिस अधीक्षकांचे गणेश मंडळांना आवाहन

आवाजाची मर्यादा पाळत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा

यवतमाळ पोलिस अधीक्षकांचे गणेश मंडळांना आवाहन

आगामी गणेशोत्सव साजरा करताना 75 डेसिबल आवाजाची मर्यादा पाळा

डीजेमुक्त आणि दारूमुक्त गणेशोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करा

यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे आवाहन

Shahapur: दि मुंबई को -ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत भानुदास महाराज भोईर विजयी

दि मुंबई को -ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र भानुदास महाराज भोईर हे दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी.

भानुदास महाराज भोईर यांच्या पॅनल चा विजयी 19 पैकी 13 जागेंवर विजयी

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय

Thane: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल

ठाणे -

- गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल

- ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

Pune: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे -

पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून आता पुन्हा उन्ह पावसासह हलक्या सरींचा खेळ सुरू

रायगड जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com