Maratha Reservation Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्वाची अपडेट; CM शिंदे राज्यपालांच्या भेटीला

Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला रवाना झाले आहेत.

Vishal Gangurde

आवेश तांदळे

Eknath Shinde News:

मराठा आंदोलकांचा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र होताना दिसत आहे. आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा आंदोलकांकडून राज्यातील काही भागातील लोकप्रतिनिधींची घरे-कार्यालये पेटविल्याची घटना घडली आहे. याच मराठा आरक्षणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. (Latest Maratha News)

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्याच्या राजकारण तापलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या मराठा आंदोलनादरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्वाची अपडेट हाती आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल बैस यांच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात राज्यपालांना याची माहिती देण्या संदर्भात भेट घेत असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उग्र होताना दिसत आहे. बीडमध्ये दोन आमदारांची घरे जाळण्यात आली आहे.

तर काही राजकीय नेत्यांची कार्यालये जाळण्याचीही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर राज्यपालांना पत्र दिल्याचीही माहिती मिळाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या कोर कमिटीची बैठक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज भाजपने बैठक आयोजित केली. मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी दिला राजीनामा आहे. तर काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. या सर्व विषयावर बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

SCROLL FOR NEXT