Maratha Aarakshan: मराठा आंदोलन पेटलं! बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला लावली आग

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाचे आंदोलनाने आता तीव्र रुप घेतलंय. अनेक ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या आहेत.
Maratha Aarakshan:  मराठा आंदोलन पेटलं! बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला लावली आग

Maratha Aarakshan :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतेत सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार दोन्ही बाजुने कोंडीत सापडलंय. एका बाजुला सरकारमधील आमदार आणि खासदार आरक्षणाच्या समर्थनात राजीनामा देऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजुला राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक होत त्यांनी विविध ठिकाणी जाळपोळ केलीय. (Latest News)

आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना आधी घडली. त्यानंतर राज्यातील विविध भागात जाळपोळच्या घटना घडू लागल्या आहेत. सोळंके यांचे वाहन जाळल्यानंतर मराठा आंदोलकांनी माजलगाव येथील नगरपरिषदेची इमारत जाळली. दुसरीकडे औरंगाबद जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड तेथील काही मराठा आंदोलांनी केलीय. राज्यातील मराठा आंदोलक संतप्त झालेले असताना मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

मोटरसायकल पेटवल्या

बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर येथील दोन मोटरसायकल हे जमावांने पेटवल्या. मराठा समाज सरकारविरोधात संतप्त झालाय. समाजातील काही आंदोलकांनी ठिकठिकाणी जाळपोळ केलीय. मराठा इतका आक्रमक झालाय की, आग शमवण्यसाठी जाणाऱ्या अग्निशमन दलाचे वाहनं देखील त्यांनी पेटवून दिलेत. बीडमध्ये राष्ट्रवादी भवन, आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला आणि जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटवलंय. संदीप क्षीरसागर यांचा बंगला पेटवल्याची घटना घडल्यानंतर आग शमवण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन दलाचे वाहन देखील आंदोलकांनी पेटवलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जालना

जालनामधील घनसावंगीत असलेलं भाजपचे कार्यालय आंदोलकांनी फोडलंय. तसेच भाजपचे सतीश घाडगे पाटील यांचेही कार्यालय फोडलंय. जालना -संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी फाटाजवळ मराठा समाज आक्रमक झाला. या महामार्गावर टायर जाळून आणि महामार्गावर सिमेंटचे पोल टाकून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च

मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्चच आयोजन करण्यात आलं. ज्या मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांचे मुलांनी या मार्चमध्ये सहभाग घेतला. मराठ्यांच्या लेकरांनो आत्महत्या करू नका. आमचे वडिलांनी जे चूक केली ती तुम्ही करू नका. आता रडायचं नाही तर लढायचं असे घोषणा देत नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कॅण्डल मार्च काढण्यात आला होता.

सोलापुरात मराठा आंदोलन पेटलं

सोलापुरात देखील आंदोनल तापलंय. येथील गोड रोडवरती मराठा आंदोलकांनी टायर जाळले. यामुळे येतील वाहतूक विस्कळीत झालीय.

हिंगोलीच्या आजेगाव मध्ये मराठा आंदोलकांनी राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेमध्ये स्थानिक भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा देखील फोटो लावण्यात आला होता.

Maratha Aarakshan:  मराठा आंदोलन पेटलं! बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला लावली आग
Maratha Reservation: बीडमध्ये मराठा आंदोलन पेटलं; आमदारांच्या बंगल्यानंतर नगरपालिकेला लावली आग, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com