Maratha Reservation Latest Updates tomorrow regarding giving kunbi certificate to maratha community Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा समाजाला कुणबी दाखला मिळणार? शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, पडद्यामागे काय घडतंय?

Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्वाची बैठक होणार.

Satish Daud

Maratha Reservation Latest News: जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. या लाठीमारात अनेक मराठा बांधव तसेच महिला गंभीर जखमी झाल्या. पोलिसांच्या या कृतीने मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्वाची बैठक होणार. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहे.

या बैठकीत मराठा समाजाच्या (Maratha Reservation) महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ हे या समितीच्या बैठकीतले प्रमुख मुद्दे चर्चेले जाणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांना बोलावलं

मराठा आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यात तब्बल ७ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना देखील महाराष्ट्र सरकारने या बैठकीला निमंत्रण पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारी अधिकारी आणि जरंगे पाटील यांच्यात बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले.

या बैठकीत मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, अहमदनगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक असे सर्व वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT