Pimpri Chinchwad News : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळवून देण्यासाठी आता मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरात नुकतीच मराठा आरक्षण एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतून राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. (Maharashtra News)
मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घ्यावा, गरज पडल्यास केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी, अन्यथा 15 मे पासून प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्याच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा गोंधळ घालो आंदोलन करणार असा इशारा सरकारला देण्यात आला.
त्यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर एक जून पासून मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर मराठा क्रांती मोर्चा बेमुदत उपोषण आंदोलन करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) मराठा आरक्षण एल्गार परिषदेतून दिला आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर रित्या टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्या, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नाेकर भरती करू नका, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांची कामकाज लवकर पुर्ण करा अशा काही महत्त्वपूर्ण मागण्या मराठी क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण एल्गार परिषदेच्या माध्यमातून केल्या आहेत अशी माहिती सुभाष दादा जावळे पाटील (अध्यक्ष मराठा आरक्षण समन्वयक समिती) यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.