Maratha Community 10 Percent Reservation Will Be Provided To Maratha Samaj Big Decision in Maharashtra Cabinet Meeting Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan Percentage: मोठी बातमी! मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार; कायदा मंजूर होण्याआधीच सरकारचा मोठा निर्णय

Update On Maratha Reservation Percentage News: आरक्षण दिलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Satish Daud

Maratha Reservation Percentage Latest News

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज (२० फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा केला जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) घेतली. या बैठकीत मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, आरक्षणाला सर्व मंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा केला जाणार आहे. तसेच कोर्टात हे आरक्षण नेमकं कसं टिकणार? यावरही देखील लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अहवालात काय?

महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा अहवाल मागासवर्ग आयोगाने दिला आहे आहे. तसेच, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असून त्यांना इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल, अशी माहिती देखील मागासवर्ग आयोगाने दिली आहे. न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करून हा संपूर्ण अहवाल तयार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT