Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar in VidhanBhavan: अजित पवारांच्या विधानभवनातील ऑफिसमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे कोणते आमदार भेटून गेले?

NCP MLAs meets Ajit Pawar: अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार आजच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात आहे.

राज्याच्या राजकारणात आज वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. अजित पवार यांना पक्षातील बहुतांश आमदारांचा देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत.  (Latest Marathi News)

अजित पवार सकाळपासून विधीमंडळातील त्यांच्या ऑफिसमध्ये तळ ठोकून आहेत. अनेक आमदार त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे. (Political News)

अजित पवार यांना सकाळपासून भेटलेले आमदार

>> शेखर निकम

>> धर्मराव बाब अत्राम

>> धनंजय मुंडे

>> नितीन पवार

>> अनिल पाटील

>> अण्णा बनसोडे

>> संजय मामा शिंदे

>> देवेंद्र भुयार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

Fact Check: सचिन तेंडुलकरची लेक लवकरच होणार देओल कुटुंबाची सून? सनी देओलच्या मुलासोबत जोडलं नाव

Monday Horoscope: आज या राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार आनंदाची बातमी, तर कोणाला करावा लागणार खर्च?

SCROLL FOR NEXT