Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : सरकारने भंगार खेळ खेळणं बंद करावं, आरक्षण देऊन टाकावं; आझाद मैदानातून मनोज जरांगे काय म्हणाले?

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी वाढवून मिळालीये. यानंतर पुन्हा एकदा सरकारने आरक्षण देऊन टाकण्याची मागणी जरांगे यांनी केली.

Vishal Gangurde

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात उपोषण

मनोज जरांगे यांना आणखी एक दिवस आंदोलनाला परवानगी

मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

आंदोलकांसाठी शौचालयाचीही सुविधा पुरवल्या नसल्याचा आरोप जरांगेंनी केला

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाला आणखी एक दिवसाची परवानगी वाढवून मिळाली आहे. त्यामुळे उद्या शनिवारी देखील मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु राहणार आहे. आंदोलन करण्यासाठी मुदत वाढल्याने मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सरकारने आंदोलकांसाठी कोणतीही सोय केली नसल्याचे जरांगे यांनी म्हटलं. सरकारने भंगार खेळ खेळणं बंद करून आरक्षण देऊन टाकावं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात सांयकाळी ७ वाजता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, ' सरकारने भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा खेळ खेळावा. एकेक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा कायम स्वरुपी दिली, तरीही हे उपोषण निर्णय होईपर्यंत सुरू राहणार आहे. सरकारच्या हातात आहे की, ते आंदोलन मोडायचे की, मला गोळ्या घालायचे. जेवणाचे हॉटेल बंद आहे. संडासांना कुलूप लावल्याने सीएसएमटी स्टेशनवर गेले'.

'तुम्ही संडास वगैरे ठेवत नाही, पाणी देत नाही, मग इंग्रजांपेक्षा मोठे आहेत. मराठे घुसले आणि जाम केलं. सरकार आठमुठे न करता सहकार्य केले पाहिजे. त्यामुळं आम्ही पण केले. परिस्थिती सरकारला जाणून घेणे गरजेचे होते. एकेक दिवसाची रडक्यासारखी परवानगी देतात. तुम्ही ज्यावेळी तिकडे येता त्यावेळी आम्ही असेच करतो का? तुम्ही इकडे त्रास दिला तर तुम्ही तिकडे आल्यावर आम्ही त्रास देणार आहे. बदला होणारच आहे, असेही जरांगे पुढे म्हणाले.

'तुमचा रस्ता मोकळा केला. मराठ्यांच्या पोरं कोणाला चावतात का? खेड्यातले लेकरे आहेत. काही काही पाहत असतील. मी निष्ठेने करतोय. बेगडी करीत नाही. मराठ्यांची पोरं काहीही करणार नाहीत. त्यांना चीड आणू नका. गोर गरीबांचे पोरं आहेत. ते माज नाही, तर वेदना घेऊन आलेत. मी मेल्यावर द्या, हरकत नाही पण द्या. सत्ता मराठ्यांनी दिली. पण फडणवीसांच्या आडमुठेपणामुळे नरेंद्र मोदी- अमित शहांना डाग लागणार आहे. फडणवीससाहेब तुमचं कर्तृत्व सांगा? धनगरांना आरक्षण दिले नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT