Manoj Jarange Patil  Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Protest: मोठी बातमी! मराठा-कुणबी एकच, सगेसोयरेबाबतही ठरलं; नेमका काय निर्णय झाला?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेबाबत केलेली मागणी सरकारने मान्य केली आहे. यासंदर्भातला जीआर काढण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी मागण्यात आला आहे. यावेळी नेमकं काय बोलणं झालं वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे यांचे आमरण उपोषणाचा आज ५वा दिवस.

  • मराठा-कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्याची मागणी.

  • सरकारने जीआरसाठी २ महिन्यांचा अवधी मागितला.

  • सगेसोयरे संदर्भातील ८ लाख हरकतींची तपासणी सुरू.

मराठा समाजाला आोबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानावर बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आरक्षण मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी घेतला आहे. अशामध्ये मराठा उपसमितीच्या सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारने तयार केलेला मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला.

'मराठा कुणबी एकच आहे असा जीआर काढा. प्रक्रिया किचकट आहे. त्यासाठी वेळ लागेल. महिना नाही तर दोन महिना घ्या पण जीआर काढणार.', अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर सरकारने मराठा- कुणबी एकच असण्याबाबतचा जीआर काढण्यासाठी २ महिन्यांचा वेळ मागितला.

मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा यावर सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितला आहे. मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ४५ दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडे विखे पाटील यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला. त्यावर जरांगेंनी दोन महिन्याचा वेळ दिला आहे.'

'सगेसोयरेच्या ८ लाख हरकती आल्या आहेत. त्याच्या तपासणीसाठी वेळ लागेल. सगेसोयऱ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येत आहे. त्यासाठी वेळ लागेल. सर्व मागण्यांचा जीआर काढला जाणार आहे.' , असे विखे पाटील यांनी सांगितले. विखेंच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी जीआर काढण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी दिला. 'जीआर काढल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुम्ही आजच याबाबतचा जीआर काढा. ९ वाजता मुंबई खाली करतो.', असे मनोज जरांगे यांनी सांगितले. आधी ३ जीआर काढण्यात याव्यात. हैदराबाद, सातारा यांचे वेगळे जीआर आणि इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT