Manoj Jarange Hunger Strike Saam tv news
मुंबई/पुणे

Manoj Jarange Health Update : दुसऱ्या दिवशीच प्रकृती खालावत चालली, बोलता बोलता जरांगेंनी दिली प्रकृतीची अपडेट

Manoj Jarange Hunger Strike: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून प्रकृती थोडी अस्थिर झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जखमेवर मीठ चोळण्याचा थेट आरोप केला.

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून प्रकृती थोडी अस्थिर झाली आहे.

  • त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जखमेवर मीठ चोळण्याचा थेट आरोप केला.

  • आंदोलकांवर हल्ला होऊ नये, राज्य अस्थिर करू नका, असा इशारा त्यांनी दिला.

  • मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलाय. ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आता माघार घेणे नाही, असा पवित्रा जरांगे पाटलांनी घेतलाय. आझाद मैदानासह मुंबईतील विविध भागांत भगवं वादळ पाहायला मिळत आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. मात्र, त्यांची प्रकृती थोडी अस्थिर झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत अपडेट

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. 'आज उपोषणाचा दुसरा दिवस. याआधीही उपोषण केलंय. उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरूवात होतं. पण आता दुसऱ्या दिवसापासून तसं सुरू झालंय', अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली. 'दोन दिवसांपासून प्रवास अन् आधीच्या उपोषणामुळे असा त्रास जाणवत असावा', अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस जखमेवर मीठ चोळणारा माणूस

यावेळी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. 'आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे आहोत. देवेंद्र फडणवीस जखमेवर मीठ चोळणारा माणूस आहे. अमित शहा यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतील. मराठ्यांच्या मागण्याकडे त्यांना वेळ नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचं. मग त्यांना गणपती, हिंदुत्व, देव-देवता दिसत नाही. वातावरण फक्त दूषित करायचे. हे फडणवीस यांचे काम आहे', असा थेट आरोप त्यांनी केला.

राज्य अस्थिर झाले तर देवेंद्र फडणवीस जबाबदार

'अंमलबजावणी करायला हवी. कुणाच्या शब्दावर उपोषण मागे घेणार नाही. माझ्या समाजातील आंदोलकांवर हल्ला होता कामा नये. राज्य अस्थिर करू नका. राज्य अस्थिर झाले तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. तुम्ही मुंबईचा विचार करताय, पण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ मोठं आहे. लोकसंख्या, महसूल, संख्या अन् राजकारणही ... फक्त मुंबई तुमची नाही. तुम्हाला महाराष्ट्राने मुख्यमंत्री केलंय', असंही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT