Manoj Jarange Patil warn to Girish Mahajan on Maratha reservation Kunbi certificate Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange News: गिरीश महाजनांनी मराठा समाजाला नडू नये; अन्यथा 'त्या' रेकॉर्डिंग व्हायरल करू, जरांगेंचा इशारा

Manoj Jarange News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी गिरीश महाजनांना मोठा इशारा दिला आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil warn Girish Mahajan

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रा देता येणं शक्य नाही, असं मोठं विधान मंत्री गिरीष महाजन यांनी केलं आहे. ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाच कुणबी दाखल मिळाले, असंही महाजन यांनी स्पष्ट सांगितलं आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी गिरीश महाजनांना मोठा इशारा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगे पाटील सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी जळगावात टोलेजंग सभा घेतली. यानंतर आज त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले, आमच्याकडे एक वार्ता पसरवली होती, की खान्देश आणि विदर्भातील मराठा एक होत नाही. पण मी कालपासून बघतोय, प्रचंड संख्येने मराठा बांधव एकत्र आले आहेत. यापुढेही येतील, असं जरांगे म्हणाले.

गिरीष महाजन अंतरवाली सराटी गावात येऊन म्हणाले होते, की कायदा पारीत करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. आम्हाला १ महिन्यांचा वेळ द्या, नोंदींचा अहवाल बनवू कायदा पारीत करू, असा महाजनांनी शब्द दिला होता. आता त्यांनी वेगळी विधाने करू नये, असं जरांगे पाटील म्हणाले.

गिरीष महाजन यांनी मराठा समाजाला नडू नये, त्यांच्या सर्व रेकॉर्डिंग तसेच व्हिडीओ शुटिंग आमच्याकडे आहेत. वेळ पडली, तर आम्ही त्या राज्यभरात व्हायरल करू, असा इशारा जरांगे यांनी महाजन यांना दिला आहे. इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्याने भरकटल्यासारखे वक्तव्ये केले नाही पाहिजेत, असा सल्लाही जरांगे यांनी दिला आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, आमचा गिरीष महाजन यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना ३ वेळा व्यासपीठावर मानसन्मान दिला. त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे, की आम्ही कायदा पारीत करतो फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. त्यानुसार, आम्ही सुरूवातीला ४ दिवस, नंतर ४० दिवसांचा आणि आता दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT