Manoj Jarange Mumbai Maratha Morcha Live Update Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबई येथे मराठा कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका, दुर्दैवी मृत्यू

Manoj jarange patil protest live updates Mumbai day 2 : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात भगवं वादळ मुंबईत धडकलेय. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी मुंबईत एल्गार पुकारलाय. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाचे क्षणा क्षणाचे लाईव्ह अपडेट

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईत मराठा आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

मुंबई येथे मराठा कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका, दुर्दैवी मृत्यू.

मयत तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील असल्याची माहिती.

विजय घोगरे मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्याचं नाव..

Manoj Jarange Patil Protest Live Updates : शिंदे समितीने जरांगे पाटील यांचा निरोप विखे पाटलांना कळवला

शिंदे समितीने जरांगे पाटील यांचा निरोप विखे पाटलांना कळवला

विखे पाटील आज जरांगे यांचा निरोप घेवून मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार

आज रात्रीच आरक्षण उपसमितीच्या पुढच्या बैठकीची तारीख ठरणार

विखे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची वेळ मागितली

आज बैठकीतील निर्णय आणि जरांगे यांचा संवाद याच्यावर करणार चर्चा

आज अमित शहा असल्या कारणाने आज दिवसभरात होवू शकली नाही भेट

आज रात्री दोन्ही नेते भेटण्याची शक्यता

Manoj Jarange Patil Protest Live Updates : राधाकृष्ण विखे पाटील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

राधाकृष्ण विखे पाटील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

जरांगे पाटील यांच्यासोबतच्या चर्चेचा देणार तपशील

Manoj Jarange Patil Protest Live Updates : उद्धव ठाकरे यांनी फोनवरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी साधला संवाद

उद्धव ठाकरे यांची फोनवरून मनोज जरांगे पाटील यांचे बोलणे झाले. अंबादास दानवे यांनी फोन लावून दिला.

दोन मिनिटे मनोज जरांगे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगे पाटील यांच्या वतीने उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज

जरांगे पाटील यांच्या वतीने उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करण्यात आलेला आहे.

मुंबई पोलीस उद्याची परवानगी देण्यासाठी सकारात्मक.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे मनोज जरांगे यांच्या भेटीला येणार आहेत.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आंदोलकांनी रस्त्यावर कबड्डी खेळत वेधून घेतले लक्ष

मराठा आंदोलन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबई आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आंदोलनात वेळ काढण्यासाठी आंदोलन वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. हलगीवर नाचणे, कीर्तन करणे, गाणे लावून नाचणे, असे प्रकार सुरू आहेत. मराठा आंदोलकांनी रस्त्यावर कबड्डी खेळत लक्ष वेधून घेतले.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगे यांच्या भेटीनंतर उपसमितीची पुन्हा बैठक

जरांगे यांच्या भेटीनंतर उपसमितीची पुन्हा बैठक

विखे पाटील यांच्या निवासस्थानी उपसमितीची बैठक

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगेंची शिंदे समितीसोबत चर्चा निष्फळ

मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीसोबत चर्चा निष्फळ

उपोषण मागे घेण्यास जरांगे पाटील यांचा नकार

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आंदोलनावर ठाम पाटील समितीवर भडकले

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी नगरमधून 12 टन फरसाण रवाना

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे मात्र काही ठिकाणी हॉटेल बंद करण्यात आले आहेत त्यामुळे अनेक मराठा आंदोलकांना खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईकडे आंदोलकांसाठी विविध प्रकारे खाण्यापिण्याचे सामान पाठवण्यात येत असून अहिल्यानगर जिल्ह्यातून जवळपास दहा ते 12 टन फरसाण पाण्याच्या बाटल्या आज मराठा बांधवांसाठी पाठवण्यात आले.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आता जीआर काढा, आंदोलन सोडतो - मनोज जरांगे

न्यायमूर्ती शिंदे आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान आता जीआर काढा, आंदोलन सोडतो, असे मनोज जरांगे यांनी न्यायमूर्ती शिंदे यांनी म्हटले.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकारचा दिलासा

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकारचा दिलासा.
राज्य सरकारनं जाहीर केलं आहे की, मृत आंदोलकांच्या 23 पात्र नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी दिली जाणार आहे.

यासंदर्भात शिंदे समितीच्या अहवालातही नमूद करण्यात आलं आहे. तसेच, शिंदे समितीला आवश्यकतेनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगे पाटील यांच्या भेटीला

माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगे पाटील यांच्या भेटीला

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होणार चर्चेला सुरुवात

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आंदोलकांच्या होत असलेल्या असुविधांबद्दल आमदार अमोल मिटकरींची खंत

आंदोलनस्थळी मराठा आंदोलकांच्या होत असलेल्या असुविधांबद्दल आमदार अमोल मिटकरींची खंत. जर आंदोलनाची वेळ तीन महिने आधीच माहीत होतीय.‌ तर सरकारने आंदोलकांच्या पाणी आणि इतर प्राथमिक गरजांची व्यवस्था करायला हवी होतीय. आमदार मिटकरींचा सरकारला घरचा आहेर. आंदोलकांवर मुंबईला यायची वेळ यायला नको होती.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी जरांगेच्या भेटीला जाणार

शिंदे समितीचे माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेसोबत चर्चा करणार

सोबत कोकण विभागीय अध्यक्षही चर्चेसाठी उपस्थित असणार

जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या निवेदनानुसार उपसमितीच्या बैठकीत झाली चर्चा

मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत काय तोडगा निघणार ? याकडं लक्ष

Gunaratna Sadavarte यांना मराठा आंदोलकांचं अनोख्या स्टाईलने उत्तर! | Maratha Reservation

मराठा आरक्षणावर सातत्याने टीका करणारे गुणरत्न सडवर्ते यांना आंदोलकांनी त्यांच्या भाषेच्याच शैलीत आणि अनोख्या पद्धतीने उत्तर दिलं. या उत्तरातून मराठा समाजाचा रोष, बुद्धिमत्ता आणि शांततामय प्रतिकार स्पष्ट दिसून आला. संबंधित व्हिडीओ आणि प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

एकनाथ शिंदे यांचे दरे गावी जाणं हे पटण्यासारखं नाही - सुषमा अंधारे

एवढी गंभीर परिस्थिती असताना एकनाथ शिंदे यांचे दरे गावी जाणं हे पटण्यासारखं नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षणाबाबत बोलणारे एकनाथ शिंदे आता कुठे आहेत?

एकनाथ शिंदे जबाबदारीतून पळ काढत आहेत का

एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला म्हणून फडणवीस टाळाटाळ करत आहेत का

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शीतयुद्धात मराठा ओबीसी यांच्यातील वीण असू नये

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE :  जालन्यातील आसरखेडा येथील ग्रामस्थ मराठा आंदोलकांना दहा क्विंटलच्या पोळ्या आणि ठेचा मुंबईला पाठवणार..

जालन्यातील आसरखेडा गावात दवंडीच्या सहाय्याने स्वयंपाक तयार करण्याचं करण्यात येतंय आवाहन

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावामधून मुंबईला मराठा आंदोलकांना आज रात्री खाण्यापिण्यासाठी पोळ्या आणि ठेचा पॅकिंग करून पाठवणार...

त्यासाठी गावामध्ये सकाळी पोळ्या तयार करण्याचे आवाहन दवंडीच्या माध्यमातून करण्यात आल.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईत आंदोलनासाठी गेले आहे. मुंबईमध्ये आंदोलकांची खाण्यापिण्याची हाल होत असल्याने आता गावातून मराठा बांधवांना खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला पाठवण्याची तयारी करत आहे.

Manoj Jarange Patil Protest Live Updates :  बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही.

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates:  आरक्षणाचा चेंडू शरद पवारांनी केंद्राकडे टोलावला

घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. केंद्र सरकारने यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतं. त्यामुळे घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे म्हणत शरद पवार यांनी आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलावला आहे. अहिल्यानगरमधील कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

मराठा आऱक्षणासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे देतील -राज ठाकरे

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. मागील वेळी एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये जाऊन प्रश्न सोडवला होता, ते पुन्हा का आले, याचे प्रश्न एकनाथ शिंदेंच देऊ शकतात.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चक्क रेडा आझाद मैदानामध्ये पाठवण्यात येणार आहे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच मागणीसाठी म्हणून मनोज जरांगे पाटील मैदानात उतरलेला आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मालकाने चक्क आंदोलनात रेडा पाठवण्यात येणार आहे

मुंबई महानगरपालिकेच्या समोर एक मराठा लाख मराठा च्या घोषणा विदेशी तरुणांकडून देण्यात आले आहेत.

जालन्यातील आसरखेडा येथील ग्रामस्थ मराठा आंदोलकांना दहा क्विंटलच्या पोळ्या आणि ठेचा मुंबईला पाठवणार

जालन्यातील आसरखेडा गावात दवंडीच्या सहाय्याने स्वयंपाक तयार करण्याचं करण्यात येतंय आवाहन

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावामधून मुंबईला मराठा आंदोलकांना आज रात्री खाण्यापिण्यासाठी पोळ्या आणि ठेचा पॅकिंग करून पाठवणार...

त्यासाठी गावामध्ये सकाळी पोळ्या तयार करण्याचे आवाहन दवंडीच्या माध्यमातून करण्यात आल.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईत आंदोलनासाठी गेले आहे. मुंबईमध्ये आंदोलकांची खाण्यापिण्याची हाल होत असल्याने आता गावातून मराठा बांधवांना खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला पाठवण्याची तयारी करत आहे.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : अजित पवारांच्या विश्वासू शिलेदारांचा जरांगेंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा

“एक मराठा लाख मराठा “जरांगे पाटलांच्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा.शेतमजुरी करणारा मराठा बांधव आज हक्काची लढाई लढत असेल तर त्या लढ्याला बळ देण हे माझे कर्तव्य मी समजतो.आंदोलन संविधानीक पद्धतीने सुरू असताना त्यावर भुंकणाऱ्या झाकणझुल्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत लढाई सुरू ठेवा, असे अमोल मिटकरी म्हणाले.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठ्यांच्या वाट्याला गेला तर सत्ता गेलीच म्हणून समजा- मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Protest Live Updates :

सत्ताधारी अन् विरोधकही एका मंचावर आले. आणखी खूप लोकं आहेत, पण त्यांना इकडे येता आले नाही. पण आम्हाला पक्के माहितीये, कोण कोण सपोर्ट देणार.. २५-२६ लोकं येऊ गेले. गोर गरिबांना फडणवीस का अडवतो. राज्य अस्थिर काय मिळणार आहे... पुन्हा सत्ता मिळणार नाही. मराठ्याच्या वाट्याला गेल्या सत्ता गेलीच म्हणून समजा.. कधीच नाही मिळणार सत्ता...

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE :  मला अंबलबजावणी हवी, कुणाच्या शब्दावर उपोषण मागे घेणार नाही- मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE :

मला अंबलबाजवणी हवी. कुणाच्या शब्दावर उपोषण मागे घेणार नाही. माझ्या पोरांना बोट लागता कामा नये. हे तुम्ही समजू नका. राज्य अस्थिर करू नका. राज्य अस्थिर झाले तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. तुम्ही मुंबईचा विचार करताय, पण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ मोठं आहे. लोकसंख्या, महसूल, संख्या अन् राजकारणही ... फक्त मुंबई तुमची नाही. तुम्हाला महाराष्ट्राने मुख्यमंत्री केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुही निर्माण करू नये.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार आहे- मनोज जरांगे पाटील

आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार आहे. देवेंद्र फडणवीस जखमेवर मीठ चोळणारा माणूस आहे. अमित शाह यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतील. मराठ्यांच्या मागण्याकडे त्यांना वेळ नाही. यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा. मग त्यांना गणपती, हिंदुत्व, देव-देवता दिसत नाही. वातावरण फक्त दूषित करायचे. हे फडणवीस यांचे काम आहे.

पोरांनी शांत राहा. बीएमसीकडील रस्ता मोकळा करा. गाड्या सुरक्षित ठिकाणी लावा. दुचाकी मैदान, मार्केटला लावा. मुंबई आपली आहे, ती मोकळी करा. पोलिसांनी दिलेल्या पार्किंगला लावा. रोडवर गाड्या लावू नका.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुख्यमंत्री साहेब मराठ्यांना वेठीस धरू नका, आरक्षण द्या- मनोज जरांगे पाटील

मुख्यमंत्री साहेब तुम्हाला योग्य संधी आली, त्यांना आरक्षण द्या.. तुम्हाला कधीच विसरणार नाही. मराठ्यांना वेठीस धरू नका. संधीचे सोनं करा. यांना आरक्षण द्या.. तुम्हाला वाटत असेल यांना मी हाणेन मारेल. पण तुमच्या आय़ुष्यातील सर्वात वाईट दिवस हा असेल. कारण तुमच्यामुळे मोदी आणि शाह यांना अडचण येणार आहे.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश मला माहिती नाही- मनोज जरांगे पाटील

गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश मला माहिती नाही. पण आंदोलानाची दिशा सध्या शांत ठेवा. पाहूयात किती दिवसात आंदोलन देतात. तुम्ही हॉटेल वैगरे बंद केले, त्यामुळे पोरं वैतागले आहेत. आंदोलकांना सुविधा देणं काम आहे. आयुक्तांचे काम आहे. त्यामुळे पोरं वैतागली आहेत. बीएमसी आंदोलनासमोर आंदोलकांनी शांत घ्यावे. आयुक्त साहेब तुम्ही निवृत्त झाले तरी सुट्टी देणार नाही. मराठ्यांच्या पोरांचे पाणी बंद करू नका. हे सगळे मुख्यमंत्री करीत आहेत. पाणी बंद दुकाने बंद केले. हाल होऊ द्या. बघ किती दिवस आपले हाल करतात. इकडे आझाद मैदानात या.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE :  फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर जखमेवर मीठ चोळणारा माणूस आहे- मनोज जरांगे पाटील

मुख्यमंत्री गोरगरिबांच्या पोरांना त्रास देत आहे. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातले काढून टाका. मराठ्यांचा संयम बघू नका

तुमच्या आयुष्यातील सर्वात दिवस असेल जर तुम्ही पोरांना मारले. फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर जखमेवर मीठ चोळणारा माणूस आहे. बीएमसीसमोरील रस्ता क्लिअर करा. राज्य अस्थिर करू नका. नुसती मुंबई तुमची नाही. सर्वपक्षीय आमदार खासदार आले आहेत.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचंय, आरक्षण द्यायचे नाही- मनोज जरांगे पाटील

आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण करायचे नाही. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचेय. आरक्षण द्यायचे नाही. संयम धरा. आपण वाट बघू.. शांत राहा आपण वाट बघू..

तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी. पोलिसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये गाड्या लावा, ही माझी विनंती आहे. सगळ्या मुंबईत मराठे झाले आहेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का.. ते काही वाईट करणार नाहीत, हा माझा शब्द आहे. पोरांनी अजिबात वाईट करायचे नाही. फक्त वाहने सुरक्षित लावा, हे पोरांना सांगणं आहे.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE :  मराठा-कुणबी एकच आहेत- मनोज जरांगे पाटील

त्यांचे काढून घेणं म्हणजे काय... ओबीसीला उदा. ३२ टक्के आऱक्षण आहे, त्यामधील २० टक्के काढून घेणं अन् त्यांना १० टक्केच ठेवणं.. मग त्याला काढून घेणं म्हणतात. मंत्री राज्यात संभ्राम निर्माण करत आहेत. ओबीसीमधील ३२ आरक्षणातील २० टक्के मराठ्यांना काढून द्या, असे आम्ही म्हणत नाही. आमच्या ज्या नोंदी आहेत, त्या ओबीसीमध्ये आहेत. आम्ही ओबीसीमध्येच आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. हे आमचं म्हणणं समजून घ्यावे. सरकारने संभ्रम निर्माण करू नये. राज्य अस्थिर करण्याचे काम मंत्र्‍यांकडून होऊ नये.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE :  मराठ्यांना सन्मान द्या, अपमान करू नका - मनोज जरांगे पाटील

फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्यांची अंबलजावणी करणं गरजेचं आहे. त्यांनी करावी. उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरूवात होतं. पण आता दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झालेय. कारण, दोन दिवसांपासूनचा प्रवास अन् आधीच्या उपोषणामुळे हे होतेय. त्यामुळे शरिराला जास्तीचा परिणाम होतोय.

सरकारला आमचे सांगणं आहे, मागण्याची अंबलबाजवणी तात्काळ करा. मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. काही मंत्री म्हणतात, एकाचे काढून दुसऱ्याला देऊ शकत नाही. पण आम्ही त्यांचे काढून आम्हाला द्या असे म्हणत नाही. महाराष्ट्रात गैरसमज पसरू नका, आमचे आहे ते आम्हाला द्या.

Manoj Jarange Patil Protest Live Updates  वाशी रेल्वे स्टेशन वरून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने

मनोज पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव आझाद मैदानात जाणार

नवी मुंबईमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिडको एक्जीबिशन मध्ये राहण्याची व्यवस्था मोर्चेकरांची सोय करण्यात आली होती

त्यामुळे रेल्वे प्रवास करत घोषणा करत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आईच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून मराठा तरुण जरांगेच्या आंदोलनात सहभागी

घरात आईचे निधन होऊन चार दिवस झाले असतानाही कौटुंबिक आणि आईच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून फक्त आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी समाजाचा झेंडा खांद्यावर घेऊन माळशिरस तालुक्यातील एक तरुण थेट मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झाला आहे.

Manoj jarange patil protest live updates :  81 वर्षाचे जेष्ठ नागरिक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात

81 वर्षाचे जेष्ठ नागरिक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात आझाद मैदानामध्ये वाढताना दिसून येत आहेत 

81 वर्षातले ज्येष्ठ नागरिक आजोबा मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेत त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे

Manoj jarange patil protest live updates : मराठा आंदोलकांसाठी आझाद मैदानावर नाश्त्याची सोय

मराठा आंदोलक काल रात्री आझाद मैदानावरच होते. दरम्यान, आज सकाळपासूनच आझाद मैदानावर त्यांच्या नाश्त्याची सोय केली गेली आहे. त्यांना केळी, पाणी आणि नाश्त्याचे वाटप केले जात आहे.

Nashik: नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा

- एक पत्रक काढून गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची इच्छा व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

- राज्य सरकारने यासंदर्भात लक्ष घालण्याची देखील केली मागणी

- शासनाने तात्पुरत आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची देखील मागणी

- पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊ देऊ नये, यासंदर्भात उपाय योजना करावेत - राजाभाऊ वाजे

Manoj jarange patil protest live updates : मुंबईच्या मंत्रालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबईच्या मंत्रालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त, RCP मुंबई पोलीस तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आला आहे.

मंत्रालय कडे जाणाऱ्या संपूर्ण मार्गावर पोलिसांनी बॅरिकेट लावून मार्ग बंद केला आहे.

प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करूनच पोलीस आत मध्ये सोडत आहेत.

तर मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.

Manoj jarange patil protest live updates :  मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलनकर्त्यांनी आंघोळ करून रस्ता अडवला

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन कर्त्यांनी आंघोळ करून रस्ता अडवला आहे

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन कर्त्यांनी आंघोळ करून रस्ता अडवला आहे

मध्यभागी उभे राहून वाहतूक कोंडी झाली आहे

त्यामुळे तरुणाने रस्त्याच्या मध्यभागी आंघोळ करून रस्ता अडवण्यात आला आहे

हे व्हिडिओ आपल्याकडेच आहे एसकलुजी वापरा

Manoj jarange patil protest live updates : दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणासाठी मोर्चा...

माण तालुक्यातील सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणा साठी दहिवडी येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. शालेय पोशाखामध्ये या मोर्चामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच हलगीच्या कडकडाटात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा बस स्थानक मार्गे तहसीलदार कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मराठा बांधव प्लॅटफॉर्मवर

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आझाद मैदानावर चिखलाचा साम्राज्य निर्माण झाला आहे त्यामुळे मराठा बांधव अजूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहे याचाच आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे

मराठा बांधवांची नाश्त्याची व्यवस्था मराठा बांधवांकडून

मराठा बांधवांना केळी पोहे उपमा नाश्त्याचा वाटप करण्यात आलं

नाश्ता करण्यासाठी मराठा बांधवांची गर्दी

घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी

Manoj jarange patil protest live updates :  मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी काल लासलगाव येथून कार्यकर्ते भाकरी व पोळ्या घेऊन गेले या भाकरी बनवण्यासाठी लासलगावच्या मुस्लिम महिलांनी पुढाकार घेतला जवळपास 20 मुस्लिम महिलांनी 2500 भाकरी बनवत त्या कार्यकर्त्यांकडे सोपवल्या.

Manoj Jarange Mumbai Morcha LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस 

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हजारो मराठा बांधवासह मुंबईत धडकले. सकाळी १० वाजता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले. त्याआधी ही आरपारची लढाई असल्याचे सांगत मराठ्यांना धीर दिला. अन् गोळ्या घातल्या तरी आता माघार घेणार नाही, असा इशारा फडणवीस सरकारला दिला. एकीकडे मुंबईत धो धो पाऊस कोसळत होता, दुसरीकडे मराठे आझाद मैदान अन् परिसरात आंदोलन करत होते.

आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी फक्त एका दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे सरकार कोणता निर्णय घेणार, याबाबतची चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा आंदोलनासाठी आणखी २४ तासांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आजही मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन होणार आहे. आंदोलनाला मुदतवाढ मिळाल्यानंतर मराठा आंदोलकांनी रात्र रेल्वे स्टेशन, मरीन ड्राइव्ह अन् परिसरात झोपून काढली. मराठा आंदोलकांचे खाण्याचेही हाल झाल्याचे दिसून आले. काही मराठ्यांनी बिस्किट खाऊन रात्र काढली. नाशिक अन् आजूबाजूच्या परिसरातून मराठ्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर अनेकांकडून पाठिंबा देण्यात आला. विरोधी व सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांनी भेट घेऊन जरांगेंना पाठिंबा दिला. प्रकाश सोळंके यांनी सरकारने आता ठाम भूमिका घेण्याची वेळ आल्याचे सांगितले तर विजयसिंह पंडित यांनी सरकारचा दुवा म्हणून इथे आलो असून स्वतः सरकारशी बोलेन, असे अश्वासन दिले. त्याशिवाय संजय बंडू जाधत (परभणी), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), कैलास पाटील (धाराशिव), बजरंग सोनवणे (बीड), भास्कर भगरे (दिंडोरी), निलेश लंके (अहमदनगर), संदीप क्षीरसागर (बीड), अभिजित पाटील (माढा), राजू नवघरे (वसमत) यांच्यासह अनेकांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावर आता उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आज जरांगे पाटलांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय डाव खेळला जातोय, पण याचा त्यांना फटकाच बसेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एखदा १० टक्के आरक्षणाबाबत वक्तव्य करण्यात आले. त्याशिवाय मराठा समजाला आणखी काय देता येईल, याबाबत आम्ही विचारत असल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांनर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेणारे आता कुठे गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून चर्चेसाठी कुणाला पाठवले जाणार का? मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार? याकडे महाराष्ट्राचे आणि मराठा बांधवाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - शेतकऱ्याला भाव द्या, आरक्षणाची आम्हाला गरज राहणार नाही- बच्चू कडू

Maratha Protest: मुस्लिम महिलांचा पुढाकार! मराठा आंदोलनासाठी २,५०० भाकऱ्या बनवून दिल्या|VIDEO

Sonalee Kulkarni: जांभळी साडी अन् नाकात नथ, 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा अंदाज

Maratha Reservation: सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतला मोठा निर्णय

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाकेंचा एल्गार; राज्यपातळीवर घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT