Mumbai Traffic Disrupted as Maratha Reservation Protest: Saam
मुंबई/पुणे

मुंबईकरांची कोंडी; आझाद मैदान, CSMTकडे जाणारे सर्व मार्ग बंद, दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या अनेक मार्गातही बदल

Mumbai Traffic Disrupted as Maratha Reservation Protest: उपोषणाचा चौथा दिवस, पाटील यांनी अन्न-पाणी त्यागलं. सीएसएमटी, आझाद मैदान परिसरातील रस्ते बंद, वाहतुकीत मोठे बदल.

Bhagyashree Kamble

  • मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू.

  • उपोषणाचा चौथा दिवस, पाटील यांनी अन्न-पाणी त्यागलं.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असल्याचं सांगितलं.

  • सीएसएमटी, आझाद मैदान परिसरातील रस्ते बंद, वाहतुकीत मोठे बदल.

Maratha Reservation Protest: मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. त्यांनी आजपासून अन्न तसेच पाणी त्याग केले आहे. या आंदोलनाबाबत सरकारने कोणताच तोडगा काढलेला नाही. 'कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता आरक्षण कसे देता येईल?', अशी भूमीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांमध्ये असलेली धग अधिक पेटणार असल्याचं दिसून येत आहे. मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं सीएसएमटी स्थानकाबाहेर जमले आहेत. यामुळे कर्तव्यावर जाणाऱ्या कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच कारणास्तव वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कालच्या सुट्टीनंतर आज कामगार परत कर्तव्यावर परततील. दरम्यान, सीएसएमटी स्थानकावर वाढलेली गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. तर, काही मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज १ सप्टेंबर रोजी सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेनं येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

वाहतूकीत करण्यात आलेल्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी तसेच वडाळा वाहतूक पोलिसांनी वाढीव कुमक देण्यात आलीये. वडाळा वाहतूक पोलिसांना ३५ तर, आझाद मैदानात पोलिसांना ३५ अशा ७० जणांची वाढीव कुमक २वाहतूक पोलीस चौक्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोण कोणत्या वाहतूक मार्गात बदल?

जे.जे उड्डाणपुल मार्गे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहनं मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार आहे. तर, मेट्रो ते मुंबईच्या दिशेनं येणारे आझाद मैदानजवळील मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका मार्गही यावेळी बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच हजारीमल सोमानी रोड, फॅशनस्ट्रीट सीएसएमटीकडे येणारा आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. यासह हुतात्मा चौकहून सीएसएमटीच्या दिशेनं येणारे वाहतूक मार्गातही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन हा मार्गही पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT