Manoj Jarange Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange: मनोज जरांगेंना मुंबई हायकोर्टाचा झटका, आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली

Mumbai High Court On Maratha Protest: मनोज जरांगे पाटील हे २७ ऑगस्टला मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघणार आहे. जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करणार होते. पण या आंदोलनाला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकरली.

Priya More

Summary -

  • मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली.

  • गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था यामागील मुख्य कारण म्हणून कोर्टाने निर्णय दिला.

  • नवी मुंबईतील खारघर येथे आंदोलनासाठी पर्यायी जागा देण्याबाबत सरकारला निर्णय घेण्याचे आदेश.

  • आंदोलन फक्त नियुक्त ठिकाणीच करता येईल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा २७ ऑगस्टला म्हणजे उद्या मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशामध्ये मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला. मनोज जरांगेंना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी हायकोर्टाकडून नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.

मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. हायकोर्टाने परवानगी नाकारत सांगितले की, 'मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे हे अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करू शकत नाहीत.' यासाठी कोर्टाने त्यांना गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा दाखला दिला. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'लोकशाही आणि मतभेद एकत्र जातात. परंतु निदर्शने फक्त नियुक्त ठिकाणीच केली पाहिजेत.'

मुंबई हायकोर्टाने पुढे सांगितले की, 'मुंबईत सार्वजनिक जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून मनोज जरांगे यांना नवी मुंबई किंवा खारघर येथे शांततापूर्ण निषेधासाठी पर्यायी जागा द्यायची की नाही हे सरकार ठरवू शकते. सार्वजनिक सभा आणि आंदोलनासाठी नवीन नियमांनुसार परवानगी मिळाल्यानंतर शांततापूर्ण निषेध करता येतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: इंग्रजांच्या काळात आंदोलनाला परवानगी, पण फडणवीसांच्या काळात नाही; मनोज जरांगे कडाडले|VIDEO

Kunickaa Sadanand: 'सलमानला सपोर्ट केल्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या...', बिग बॉस १९मधील कुनिकाचा धक्कादायक खुलासा

बलात्काराची धमकी, २३ लाखांची खंडणी; हनी ट्रॅपमध्ये क्लब मालक अडकला, शेवटी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update: दोन गटातील राड्यानंतर धाराशिवच्या मोहा गावाला छावणीचे स्वरूप

Parle G In America: अमेरिकेत किती रुपयांना मिळतो Parle-G, किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT