Manisha Kayande News Saam tv
मुंबई/पुणे

Manisha Kayande News: 'मी शिवसेनेतच...'; मनीषा कायंदेंनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण

अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Manisha kayande News: ठाकरे गटाला गळती सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण सांगितलं. 'अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Latest Marathi News)

शिंदे गटात नव्याने प्रवेश केलेल्या मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. मनीषा कायंदे म्हणाल्या, 'गेली १० वर्ष मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत शिवसेना ही शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. मी पहिल्यांदा मतदान शिवसेनेला केलं. मी भाजपात होते, तरी काम सेनेसाठी केलं'.

कायंदे पुढे म्हणाल्या,'गेली ३ वर्ष महाविकास आघाडी होती. आम्ही उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. जुन्या लोकांना कधीच महाविकास आवडली नाही. काही गोष्टी आवडत नव्हत्या. सावरकरांचा विषय होता'.

पक्षाची विचारधारा भरकटत आहे: मनीषा कायंदे

'संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे. पक्षाने मला मान-सन्मान दिली. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची भूमिका, विचारधारा भरकटत आहे. माझी अजून १ वर्ष टर्म आहे. संघटनेत चांगलं पद द्या. एवढीच मागणी केली. मला औरंगाबादमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एका ज्युनियरला डोक्यावर बसवलं, अशी खंत कायंदे यांनी व्यक्त केली.

'मला मनमोकळेपणाने बोलू द्या. काम करण्याची संधी द्या. अनेकांना सांगितलं. पक्षाच्या निर्णयात आम्हाला कुठेच स्थान नाही. माझी गरज उरली नाही. हे गेल्या काही महिन्यांपासून दिसत होतं. महिला आघाडीची कुचंबना होत आहे. यावर कोणी बोलत नव्हतं, असे कायंदे पुढे म्हणाल्या.

पक्षाचा डीएनए बदलायला लागला आहे : कायंदे

सुषमा अंधारे यांच्या बद्दल भाष्य करताना कायंदे म्हणाल्या, 'आम्हाला नव्या लोकांबद्दल हेवा नाही. जळण्याचा काहीच विषय नाही. आम्ही देखील पक्षात काम केलं आहे. मी सुषमा अंधारे यांच्यासोबत देखील यात्रेत सहभागी झाले होते. पण, त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या, ती गोष्ट पक्षासाठी चांगली नाही. देवी-देवतांबद्दल त्यांनी काय विधान केली आहेत, त्या गोष्टी किती संभाळून घ्यायच्या. पक्षाचा डीएनए बदलायला लागला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : तोलून मापून बोला, बेधडक अजित पवारांचा 'क्वालिटी' सल्ला नेमका कुणाला?

Raj Thackeray: राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला चॅलेंज; निवडणुका घेऊनच दाखवा

Maharashtra Live News Update : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT