Pune MNS Latest News, Raj Thackeray Ayodhya visit News
Pune MNS Latest News, Raj Thackeray Ayodhya visit News  ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

Pune MNS : पुण्यातले मनसैनिक आपआपसातच भिडले; बैठकीवरुन झाला वाद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात शनिवारी (२१ मे) ला होणारी सभा रद्द झाली आहे तर दुसरीकडे पुणे मनसेच्या (MNS) मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते आपआपसातच भिडले आहेत. पुण्यातील शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष आणि मनसैनिकामध्ये झटापट झाली आहे. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे (Ranjeet Shirole MNS) आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर (Shailesh Vitkar MNS) यांची मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात झटापट झाले आहे. (Manasainiks from Pune clashed with each other; Controversy erupted over Raj Thackeray's visit to Ayodhya)

हे देखील पाहा -

रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असूनही मनसेच्या कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब विटकर यांनी बैठकीत शिरोळे यांना विचारला. त्यानंतर शिरोळे हे विटकर यांच्यावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्येही झटापट झाली. यावेळी पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या पुण्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांसमोर हा वाद झाला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंबंधी नाव नोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हे भांडण झाले. पुण्यातले हे मनसैनिक आपआपसात भिडले आहेत. (Pune MNS Latest News)

यामुळे झाली पुण्यातली सभा रद्द

मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात नदीपात्रात मनसेची सभा होणार होती. मात्र, राज ठाकरे यांचा पाय दुखत असल्याने त्यांनी पुणे दौरा रद्द केला. डॅाक्टरांची अपॅाईंटमेंट मिळाल्याने त्यांनी तातडीनं मुंबईला (Mumbai) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील नदीपात्रातील सभा रद्द करुन राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

SCROLL FOR NEXT