Ratnagiri : सहा कोटी किंमतीच्या व्हेल माशाच्या उलटीसह दोघे जण पोलिसांच्या ताब्यात

Vomit of a Whale in Ratnagiri News: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ६ कोटी रुपये किंमतीची ही उलटी आहे.
Ratnagiri Latest Marathi News, Ratnagiri crime News in Marathi
Ratnagiri Latest Marathi News, Ratnagiri crime News in MarathiSaam TV
Published On

रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (Vomit of a Whale) तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ६ कोटी रुपये किंमतीची जवळ-जवळ पावणेसहा किलो वजनाची उलटी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जप्त केली आहे. (Police have arrested two persons with vomit of a whale worth Rs 6 crore in Ratnagiri)

हे देखील पाहा -

रत्नागिरी (Ratnagiri) शहरानजिकच्या उद्यमनगर चंपक मैदानाजवळ ही व्हेल माशाची उल्टी जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लखनौमधील एका व्यक्तीसह एका स्थानिकाला पोलीसांनी अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीची तस्करी (Smugling) होत असल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. संगमेश्वरनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत मोठ्या किंमतीची उलटी जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. (Ratnagiri crime News in Marathi)

व्हेल माशाची उल्टी कशी तयार होते?

स्पर्म व्हेल या अतिशय दुर्मिळ आणि खोल समुद्रात असलेल्या वेल माशाच्या उलटीचा हा भाग असतो. जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी या उलट तिला समुद्रकिनाऱ्यावर येण्यास लागतो. विशेष म्हणजे वेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील असलेल्या क्षार मुळे उलटी समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर तरंगते. नंतर या उलटीचा गोळा कडक होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाऱ्यावर येतो.


व्हेल माशाच्या उल्टीला भारतापेक्षा विदेशात मोठी मागणी

व्हेल माशाची उलटीला भारतात सोबतच विदेशातही मोठी मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीसाठी एक किलोसाठी १ कोटी रुपये भाव आहे. तर परदेशात एका किलोसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत प्रति किलो ३ ते ४ कोटी एवढी आहे. व्हेल माशाच्या उलटीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळेच या उलटीला मोठी किंमत प्राप्त झाली आहे.

अतिउच्च प्रतीच्या सुगंधी द्रव्यासाठी होतो उपयोग

व्हेल माशाच्या उलटीचा वापर हा भारतात आणि विदेशात अतिउच्च प्रगतीच्या सुगंधी द्रव्य, परफ्युम बनविण्यासाठी होतो. सुगंधी अगरबत्तीतही या व्हेल माशाच्या उलटीचा वापर होतो. तर उलटीमुळे परफ्युमचा सुगंध हा खूप काळ टिकतो. व्हेल माशाच्या एक किलो उलटीमध्ये तब्बल दहा हजार लिटर महागडे अत्तर परफ्युम, रोजच्या वापरातील सेंट तयार करण्यात येते. तर या उलटीतून बाजारात एक किलोमध्ये हजारो कोटीची उलाढाल होते. त्यामुळे उलटीला मोठी किंमत आहे.

Ratnagiri Latest Marathi News, Ratnagiri crime News in Marathi
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसच आपसात भिडले; वादाचं रुपांतर मारहाणीत

उलटी किंवा व्हेल माशाचा भाग बाळगणे शिक्षेस पात्र

हजारो कोटींची उलाढाल बाजारात करणाऱ्या व्हेल माशाच्या उलटी किंवा व्हेल माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणे हे वन कायद्यानुसार गुन्हा असून तो शिक्षेस पात्र आहे. सादर प्रकरणी जामीनपात्र गुन्हा दाखल करून दोषी आढळल्यास किमान तीनवर्ष आणि कमाल ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा या कायद्यांतर्गत तरतूद आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com