Crime news SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai ATM Robbery : हेल्मेट घालून एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला, CCTVने पाठलाग करत आरोपीला बेड्या

Mumbai Crime News: राहुल अली अस्लम (22 वर्ष) हा तरुण 8 जून रोजी पहाटे 4-5 वाजेच्या दरम्यान अंधेरीतील एका एटीएममध्ये शिरला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबईत एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अंधेरीतील अंबोली येथील ही घटना आहेत. तरुण एटीएम फोडण्यासाठी हेल्मेट घालून आता गेला होता, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अली अस्लम (22 वर्ष) हा तरुण 8 जून रोजी पहाटे 4-5 वाजेच्या दरम्यान अंधेरीतील एका एटीएममध्ये शिरला. एटीएममध्ये जाताना त्याने डोक्यात हेल्मेट घातलं होतं. चोरीच्या उद्देशाने एटीएममध्ये शिरलेल्या आरोपीने चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसू नये यासाठी हेल्मेट घातलं होतं. (Latest Marathi News)

आरोपीने एटीएम उघडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र एटीएम उघडण्यात तो अपयशी ठरला. अखेर एटीएम उघडत नाही हे पाहून त्याने तेथून पळ काढला. सकाळी एटीएममध्ये आलेल्या सिक्युरिटी गार्डला हा प्रकार कळाल्यानंतर त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. (Mumbai News)

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी सुरु केली. पोलिसांनी एटीएमसह परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चेक केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ट्रॅक केलं. त्यानंतर ASI अजय चव्हाण यांच्या टीमने आरोपी अस्लम याला जोगेश्वरी येथून अटक केली. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT