Mumbai News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Traffic Rule News : पठ्ठ्याचा तब्बल 7 मुलांना घेऊन दुचाकीवर प्रवास; पोलिसांनी अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात राहील

Mumbai News : पोलिसांनी या व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीना वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. अनेकजण वाहतूक नियमांचा काटेकोरपणे पालन करतात. तर जे कुणी नियमांची पालमल्ली करताना आढळतात त्यांच्यावर कठोर कारवाई वाहतूक विभागाकडून केली जाते. मुंबईत वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

दुचाकीवरून एका वेळी फक्त दोघे जण प्रवास करु शकतात. मात्र अनेकजण तिघे-तिघे प्रवास करतानाही दिसतात. मात्र एका पठ्ठ्यानं एक दोन नव्हे तर सात मुलांसह दुचाकी चालवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. (Mumbai News)

मात्र असं करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी केवळ या महाशयाला दंड ठोठावला नसून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.  (Latest Marathi News)

स्वतःच्या चार मुलांना आणि शेजारच्या तीन मुलांना शाळेत सोडत असताना एका दुचाकीस्वाराने हा व्हिडीओ काढला आणि मुंबई पोलिसांना ट्वीट केला होता. त्यानंतर दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी चालकाला शोधून काढले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अशाप्रकारे आपल्या आणि शेजारच्या मुलांना शाळेत नेण्यामागे त्याचा हेतू बहुदा चांगला असावा. मात्र मार्ग चुकीचा होता. असे करणे म्हणजे सगळ्यांचाच जीव धोक्यात घालण्यासारखे होते. म्हणूनच ताडदेव पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT