navi mumbai Saam
मुंबई/पुणे

Navi Mumbai: चारित्र्यावर संशय अन् हत्या, वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेला प्रियकरानेच संपवलं

Man kills woman over suspicion: चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने महिलेची हत्या केली आहे. गळा आवळून तिला संपवलं आहे. महिला वेश्या व्यवसायात काम करत असल्याची माहिती आहे.

Bhagyashree Kamble

चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या तुर्भे येथे घडली आहे. प्रियकराला महिलेच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान प्रियकराला राग अनावर झाला. त्यानं महिलेचा गळा आवळला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तुर्भे येथील रेड लाईट परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला. महिलेला वाशी महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. २ तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपी आणि महिला २०२० पासून रेड लाईट परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांचे वय ४०च्या आसपास आहे. महिला वेश्या व्यवसायात काम करत असल्याचं माहित असूनही दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपू्र्वी महिला दुसऱ्या पुरूषाच्या प्रेमात पडल्याचा संशय त्याला होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान, प्रियकरानं महिलेचा गळा आवळला. महिलेचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपीनं तेथून पळ काढला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी वाशी येथून आरोपीला २ तासांत अटक केली आहे.

मृत महिला मुळची पश्चिम बंगालची असल्याचं स्थानिकांनी सांगितले. पूर्वी ती पतीसोबत येथे राहायची आणि वेश्या व्यवसाय करून स्वतःचा संसार चालवायची. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर मृत महिला आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते आणि ती महिला आपला व्यवसायही करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT