Titwala Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Titwala News: पत्नीची हत्या केल्यानंतर केला आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी अवघ्या 2 तासात पतीचा केला पर्दाफाश

Titwala Crime News: टिटवाळा परिसरातील आनेगाव येथे पतीने पत्नीची गळा वळून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Titwala Crime News:

टिटवाळा परिसरातील आनेगाव येथे पतीने पत्नीची गळा वळून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली. महेश मोहपे, असे या पतीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपा हिची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.

मात्र दीपा हिच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या दोन तासात त्यांनी महेशच्या बनावाचा पर्दाफाश करत महेशला बेड्या ठोकल्यात. महेश आणि दिपाचा प्रेमविवाह झाला होता. महेश वेळ देत नाही, असा त्याची पत्नी दीपा तगादा लावत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेशचे कुटुंबीय देखील दिपाला मानसिक शारीरिक त्रास देत होते, असा आरोप आहे. आज सकाळी महेश व दिपा या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या महेशने गळा आवळून दिपाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेश मोहपे याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)

टिटवाळा जवळील आणे गावात महेश मोहपे व त्याची पत्नी दीपा हे दोघे राहतात. या दोघांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आज सकाळी महेश मोहपे याने दीपा हिच्या कुटुंबीयाना दीपाने गळफास घेतल्याचे सांगितले. दिपाच्या कुटुंबियानी घरी धाव घेतली असता त्यांना संशय आला. याबाबत टिटवाळा पोलीसाना माहिती दिली. टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

टिटवाळा पोलिसांनी अवघ्या दोन तासात महेशच्या बनावाचा पर्दाफाश झाला. महेश वेळ देत नसल्याच्या तगादा दीपा सातत्याने लावत होते यातून या दोघांमध्ये वाद होत होते. महेश कुटुंबीय देखील दीपा हिला तुझ्या आईने लग्न व्यवस्थित लावून दिले नाही, असे टोमणे मारत सातत्याने त्रास देत होते. यातूनच महेश आणि दीपा मध्ये सातत्याने वाद होत होते. आज सकाळी देखील या दोघांमध्ये वाद झाला व याच वादातून महेशने पत्नी दिपाची गळा आवळून हत्या केली आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून दीपाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेशला अटक केली. या प्रकरणी टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

Cyclone Alert : देशावर 'मोंथा'चं संकट, ११० च्या स्पीडने येतंय चक्रीवादळ, IMD कडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट

Post Office SCSS Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २.४६ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

अमित शहांचा मुंबई दौरा, मोहोळ विमानतळावर; शिंदेंचा धंगेकरांना निरोप! पुण्यातील जैन हॉस्टेल प्रकरणी "ट्विस्ट" आणला का घडवला?

Kaju Usal Recipe : मालवणी स्टाइलने बनवा काजूची झक्कास उसळ, एक घास खाताच म्हणाल WOW

SCROLL FOR NEXT