Thane Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Crime News: ठाण्यात तिहेरी हत्याकांड, रागाच्या भरात बायको-मुलांना संपवलं, CCTV व्हिडीओ आला समोर

Thane News: ठाण्यातील कासारवडवली या परिसरातून तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी समोर येत आहे. या परिसरात एक चाळ आहे. या चाळीत छोटसं कुटुंब राहत होतं.

साम टिव्ही ब्युरो

Thane Crime News:

ठाण्यातील कासारवडवली या परिसरातून तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी समोर येत आहे. या परिसरात एक चाळ आहे. या चाळीत छोटसं कुटुंब राहत होतं. फरक इतकाच होता की, नवरा-बायकोमध्ये खटके उडाले होते. त्यामुळं बायको आपल्या मुलाबाळांसह भावासोबत राहत होती.

दोघांच्याही लग्नाला चार वर्ष पूर्ण झाले होते. पण लग्नानंतर दोघांमध्ये काही कारणास्तव खटके उडाले होते. त्यामुळं बायकोनं नवऱ्याला सोडलं आणि आपल्या मुलाबाळांसह दुसरी वाट धरली. यावेळी तिनं ठाण्यात राहण्याचा निर्णय घेतला. कासारवडवली या परिसरात तिनं आपला संसार थाटला. या संकटाच्या काळात बहिणीच्या पाठीमागे तिचा भाऊ खंबीरपणे उभा होता. पण तिच्या नवऱ्याला हेच खटकलं. अमित बागडी असं त्याचं नाव आहे. त्याला हे सगळंकाही पाहावलं नाही. तो भांबावून गेला आणि त्याच्या डोक्यात एकच राग शिरला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हाच राग डोक्याच ठेवून अमितनं एक प्लॅन आखला. दोघेही नवरा-बायको मूळचे हरियाणाचे आहेत. पण झालेल्या वादामुळे पत्नी ठाण्यात शिफ्ट झाली होती. रागाचा वचपा काढण्यासाठी अमित ठाण्यात आला. पण तो कोणत्या कारणानिमित्त आलाय, ते त्याच्या बायको आणि मुलांना माहिती नव्हतं. यावेळी अमितनं आपल्या बायको आणि मुलांना गाफिल ठेवलं आणि संधीचा फायदा घेत सर्वांना संपवलं.  (Latest Marathi News)

क्रिकेटची लाकडी बॅट घेतली आणि सर्वात आधी बायकोच्या डोक्यात मारली. त्यानंतर पोटच्या गोळ्यालाही सोडलं नाही. मुलगी आणि मुलाच्या डोक्यावर बॅट मारली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अमित घाबरला, बिथरला. पुढे काय करावं? हे त्याला समजेना. त्यामुळं त्याने आपल्या मूळ गावी हरियाणात धूम ठोकली.

ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी चौकशीची सूत्र हलवली. त्यानंतर ३६ तासांमध्येच अमित बागडी या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पण हत्येमागील नेमकं कारण काय? याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिलीये.

काही दिवसांपूर्वी या परिसरात महाराष्ट्रातील एका उच्च पदस्थ असणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलानं आपल्या प्रियसीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण या घटनेला काहीच दिवस पूर्णच होत नाहीत. तोवर ही दुसरी धक्कादायक घटना समोर आलीये. ठाण्याला संस्कृतीचं शहर मानलं जातं. पण याच ठाण्यात गुन्हेगाराचं प्रमाण वाढलंय का? असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT