बिअरचे बिल जास्त लावल्याच्या वादातून सौरभ वाघ यांना मारहाण.
धुमाळ कुटुंबीयांनी गावातून धिंड काढून गुडघ्यावर बसवले.
पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घटनेवरून परिसरात संतापाची लाट उसळली असून कारवाईची मागणी.
पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील वीर गावात बिअरचे बिल जास्त लावल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत गावातून धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ सुरेश वाघ असे पीडित तरुणाचे नाव असून, त्यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
समृद्धी बिअर बार हॉटेलमध्ये सौरभ वाघ यांचे चायनीज किचन आहे. या हॉटेलमध्ये दिलीप विलास धुमाळ आणि अमोल आप्पासाहेब धुमाळ हे बिअर पिण्यासाठी आले होते. त्यावेळी बारचे मालक गैरहजर असताना वाघ यांनी त्यांना बिल दिले. मात्र, बिल जास्त लावल्याचा आरोप करत या दोघांनी वाद घालायला सुरुवात केली. वादाच्या ओघात त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांना देखील बोलावून वाघ यांना दमदाटी केली आणि हाताने मारहाण सुरू केली.
धुमाळ कुटुंबीयांनी मारहाणीवर न थांबता वाघ यांची गावातून धिंड काढत त्यांना गुडघ्यावर बसवून माफी मागायला लावली. या अमानुष प्रकारामुळे गावात आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपींमध्ये दिलीप विलास धुमाळ, अमोल आप्पासाहेब धुमाळ, कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासाहेब धुमाळ, सत्यजित प्रताप सिंग धुमाळ, शंभुराज महादेव धुमाळ यांचा समावेश असून सासवड पोलिसांनी सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पसरला असून, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एका किरकोळ वादातून एखाद्याची अशी बेइज्जती करणे म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
घटना कुठे घडली?
ही घटना पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील वीर गावात घडली.
पीडित तरुणाचे नाव काय आहे?
सौरभ सुरेश वाघ.
वाद का झाला?
बिअरचे बिल जास्त लावल्याचा आरोप करून वाद सुरू झाला.
पोलिसांनी कोणत्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे?
दिलीप, अमोल, कमलेश, संदीप, सत्यजित, शंभुराज धुमाळ या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.