Andheri Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : त्यानं दोनदा नको तो स्पर्श केला; धावत्या लोकलमध्ये कॉलेजच्या तरुणीचा विनयभंग

Andheri Crime News : २६ वर्षीय तरुणाने एका महाविद्यालयीन तरुणीचा धावत्या ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर विनयभंग केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Student Molested in Running Train : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय तरुणाने एका महाविद्यालयीन तरुणीचा धावत्या ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर विनयभंग केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांच्या निर्भया पथकाने संशयित आरोपीला अटक केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणी (Young Girl ) लोकल ट्रेनच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करत होती. साधारण सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ट्रेनने विलेपार्ले स्थानक सोडले. तरुणीला अंधेरी स्थानकात उतरायचं होतं. त्यामुळं ती दरवाजात आली. पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपी तिच्या पाठीमागे उभा राहिला. त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तरुणीने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेली.

अंधेरी रेल्वे स्थानकात ट्रेन आली. इतर प्रवाशांसह तरुणीही स्थानकात उतरली. आरोपीही उतरून तिच्याच मागोमाग जाऊ लागला. फलाटावरील सरकत्या जिन्याजवळ पोहोचल्यानंतर आरोपी पुन्हा तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि तिला पुन्हा 'नकोसा' स्पर्श केला. अखेर तिनं आरडाओरड केली.

निर्भया पथकातील दोन रेल्वे पोलीस आणि इतर दोन पोलीस घटनास्थळी तैनात होते. त्यांनी संशयित आरोपीला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीवर तात्काळ कारवाई करणाऱ्या निर्भया पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT