Kalyan Latest news :  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण; पोलिसांनी चक्रे फिरवली, काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Kalyan Latest news : धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण झाल्याने एकच संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

सीएसटी-टिटवाळा लोकलमध्ये मंगळवारी अंध महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली. अंध महिलेला झालेल्या मारहाणीचा व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी एकच संताप व्यक्त केला होता. या व्यक्तीने धावत्या लोकल ट्रेनच्या दिव्यांग डब्यात महिलेला मारहाण केली होती. महिलेला मारहाण केलेल्या व्यक्तीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

सीएसटी ते टिटवाळा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या अंध महिलेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार रेल्वेच्या अपंग आणि अंध प्रवाशांसाठी राखीव डब्यात घडला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद अली हसन अली बेग असे अटक आरोपीचे नाव आहे.

सीएसटीहून टिटवाळा येथे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये कांजूरमार्ग स्थानकादरम्यान ही घटना घडली. रेल्वेमध्ये अपंग आणि अंध प्रवाशांसाठी राखीव डबा असतो. मात्र, त्या डब्यात इतर प्रवासी देखील प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कांजूरमार्ग येथे अंध महिला डब्यात चढली. मात्र डब्यात जागा नसल्यामुळे तिला बसण्यासाठी अडचण येत होती.

जागेवरून महिला आणि एका व्यक्तीमध्ये वाद झाला. याच वादातून या इसमाने तिला मारहाण केली. हा प्रकार डब्यातील इतर प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोहम्मद अली हसन अली बेग या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT