Nilesh Rane and Vaibhav Naik Saam Tv
मुंबई/पुणे

Shivaji Maharaj Statue: मालवणची घटना, ठाकरेंचे आमदार अन् ती १५ मिनिटे; राणेंचा खळबळजनक आरोप काय?

Nilesh Rane On Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच आता माजी खासदार निलेश राणे ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

Satish Kengar

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घेतनातर माफीही मागितली. यानंतरही विरोधक यावरून सातत्याने लक्ष्य करत आहेत. यातच आता माजी खासदार निलेश राणे ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

''मालवणमधील घटना घडवली गेली, असं माझं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक आमदार (वैभव नाईक) ते पंधरा मिनिटात तिथे कसे काय पोहोचले,'' असं म्हणत निलेश राणे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले हेत की, ''काय काय घडलं, कट कसा रचला गेला, हे मी बोललो होतो. हे सर्व काही दिवसांत मी पुराव्यास सकट तुम्हाला (पत्रकारांना) देईल.''

ते म्हणाले, ''रत्नागिरीत काल रात्री एक घटना घडली. येथे कोणीतरी एक हिंदू समाजाचा मुलगा आला, विचित्र अवस्थेत होता तो. त्याने येथील मावळ्यांचे पुतळे पुतळे तोडले, असं पोलिसांचं म्हणणं आहे. माझा यावर आक्षेप आहे. त्याने नेमके मावळ्यांचे पुतळे का तोडले? तो कुठून तरी आला असेल आणि कुठेतरी गेला असेल.''

निलेश राणे पुढे म्हणाले, ''आजूबाजूच्या गोष्टी न तोडता त्याने नेमकी पुतळेच का तोडले? ढाल, तलवार खाली जमिनीवर पडलेली आहेत. माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही, जे पोलीस म्हणत आहेत. माझा थेट आरोप आहे की, तो व्यक्ती आला आणि त्याने मावळ्यांच्या पुतळ्यांवरच हात का टाकला. पोलिसांनी केलेल्या तपासावर आमचा विश्वास नाही, मी आता कार्यकर्त्यांना तिथे जमायला सांगितले आहे. मी देखील आता रत्नागिरी पोहोचत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Tourism : पांढरी शुभ्र वाळू अन् निळाशार समुद्र; रायगडमधील बेस्ट कपल स्पॉट

Pankaj Tripathi Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; 89 व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

Shocking News : मित्रानेच घात केला! फिरायला घेऊन जातो सांगून घेऊन गेला; निर्जनस्थळी नेत मैत्रिणीवर बलात्कार

Horoscope Monday: आर्थिक बोजा वाढणार! आरोग्याच्या समस्या वाढतील,वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: बेळगांवात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

SCROLL FOR NEXT