>> संजय गडदे, साम टीव्ही
Malad Railway Station Accident CCTV Video: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. विविध उद्घोषणा करून प्रवाशांना याबाबत जागृतही केले जाते. तरी देखील अनेकदा रेल्वे प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईचा मालाड रेल्वे स्थानकात देखील अशीच एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. दोन तरुण मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा धुण्यासाठी उभे असताना अचानक आलेल्या जलद लोकलचा धक्का लागून अपघात घडला. या अपघातात एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयंक अनिल शर्मा असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मालाड मालवणी येथे राहणारा आहे. (Marathi Tajya Batmya)
मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून या दिवशी दुपारी साडेतीन वाजता दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून एकत्र जेवले. यानंतर जेवणाचा डब्बा आणि हात धुण्यासाठी ते प्लॅटफॉर्म वर उभे राहीले. मात्र अचानक चर्चगेटच्या दिशेने बोरिवलीकडे जाणारी वातानुकूलित जलद लोकल आली. मात्र त्या दोघांपैकी एका तरुणाला लोकल आल्याचे समजलेच नाही आणि त्याला जोरदार धडक देऊन लोकल पुढे निघून गेली. (Latest Political News)
जोरदार बसलेल्या धडकेमुळे तो तरुण प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला गेला. लोकलने दिलेल्या धडकेत त्याच्या कानातून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्याला पुढील उपचारासाठी शताब्दी हॉस्पिटल कांदिवली येथे घेऊन जाण्यासाठी ऑन ड्युटी स्टेशन मास्तर यांनी पोलीस शिपाई राठोड यांना सूचना केली. हमालाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने शताब्दी हॉस्पिटल येथे तरुणाला नेले असता दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.(Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.