Malad home cleaning thef saam tv
मुंबई/पुणे

ऑनलाईन होम क्लिनिंग पडले महागात, घर साफसफाईच्या बहाण्याने 12 लाखांची चोरी

Home Cleaning Staff Steal Gold and Silver Worth Rs 12 Lakh: ऑनलाईन अॅपवरून होम क्लिनिंग बुक करताय? तर सावधान.... घर साफसफाईच्या बहाण्याने होम क्लिनिंग कर्मचाऱ्यांनी घरचं साफ केलयं...तब्बल 12 लाखांची चोरी होम क्लिनिंग कर्मचाऱ्यांनी कशी केली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Suprim Maskar

दिवाळीचा सण जवळ आल्यावर घराची स्वच्छता करण्यासाठी अनेक नागरिक ऑनलाईन ॲप्सचा आधार घेतात. मात्र, मुंबईतील मालाड भागात साफसफाई करण्यासाठी आलेल्या काही कर्मचाऱ्यांनीच बेडरूममधील कपाटातून तब्बल 12 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमकी घटना काय? पाहूयात...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराची स्वच्छता करण्यासाठी 52 वर्षीय महिलेनं होम क्लिनिंग अॅपद्वारे बुकींग केलं

संबंधित कंपनीचे 4 कर्मचारी साफसफाईसाठी महिलेच्या घरात आले

काम संपवून हे कर्मचारी निघून गेल्यानंतर महिलेने घरातील कपाट तपासले असता, बेडरूममधील सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

5 तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, 1 तोळ्याचं मंगलसूत्र, सोन्याची बिस्किटं, 500 ग्रॅम चांदीची वीट असा तब्बल 12 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

होम क्लिनिंग कंपनीच्या चोरट्या मोबाईल बंद ठेवून अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न केला...

मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे नालासोपारा, वसई, पालघर आणि बोईसर परिसरातून तीन गुन्हेगारांना अटक केलीय

या प्रकरणात सत्यम शुक्ला, अनिश चौरसिया, पवन धीवर या तीन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेत..

दरम्यान पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून चोरीस गेलेला 100 टक्के मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केलाय..

मालाडमधील घटनेनंतर तुम्ही कुठलीही ऑनलाईन सेवा घेत असाल आणि जर अनोळखी व्यक्तीना आपल्या घरी बोलवत असाल तर त्याआधी संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी पडताळून पाहा..अशा अनोळखी व्यक्तींकडून घरात काम करून घेत असाल तर सतर्कता बाळगता नाहीतर अन्यथा होम क्लिनिंगसारख्या ऑनलाईन सुविधा चांगल्याच महागात पडू शकतात....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silk Saree Designs: महिलांसाठी सिल्कच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 लेटेस्ट पॅटर्न्स

Maharashtra News Live Update: Nashik: बिबट्याच्या हल्यात तरुण शेतकरी जखमी

विधानसभा निवडणुकीआधी ५ राज्यात मोठी घडामोड; SIR नंतर घटले २.२९ कोटी मतदार, युपीत किती मतदारांचं नाव झालं रद्द?

घरात जमिनीखाली पुरले नोटांचे निळे ड्रम्स, प्रयागराजमधील कॅशचं पुणे कनेक्शन?

Fact Check: केंद्र सरकारकडून 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट? अर्ज भरलेल्यांनाच मिळणार योजनेचा लाभ?

SCROLL FOR NEXT