Malabar Hill Lake Saam Digital
मुंबई/पुणे

Malabar Hill Lake: मलबार हिल जलाशयसंदर्भात अद्याप सर्वसमावेशक अहवाल नाही, महापालिकाप्रशासनाने केला खुलासा

Sandeep Gawade

Malabar Hill Lake

मुंबई महानगरपालिकेतर्फे मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करावी याअनुषंगाने पुनर्विचार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीचा सर्वसमावेशक अहवाल महानगरपालिका प्रशासनाकडे सादर झालेला नाही. तज्ज्ञ समितीच्या चर्चेच्या आधारे, भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) मुंबई यांचेकडून सर्वसमावेशक अहवाल सादर होईपर्यंत, मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती बाबत कोणताही निष्कर्ष काढणे उचित ठरत नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध प्रसारमाध्यमांतून मलबार हिल जलाशय संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये नमूद केले आहे की, मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती करावी, असा अंतरिम अहवाल तज्ज्ञ समितीने सादर केला आहे आणि त्यावर चार सदस्यांच्या सह्या आहेत. या बातम्यांआधारे जनमानसात गैरसमज पसरू नये, या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने हा खुलासा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम न होता मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी / दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे आयआयटी मुंबईचे संरचना, जलशास्त्र, भूरचनाशास्त्र या विषयांचे चार तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच तीन स्थानिक नागरिक व महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.

जलाशय पुनर्बांधणीच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून योग्य कार्यपद्धती सुचविण्यासाठी भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) मुंबई यांनी तज्ज्ञ समितीच्या चर्चेच्या आधारे तसेच, सर्व पैलुंचा विचार करून, मुंबईकर नागरिकांकडून प्राप्त झालेली पत्रं व ई-मेल आदी विचारात घेवून, कृतीयोग्य प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे. या सर्व अटींची पूर्तता करणारा सर्वसमावेशक अहवाल भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) मुंबई यांचेकडून प्राप्त होईपर्यंत, जलाशयाच्या पुनर्बांधणी किंवा दुरुस्तीबाबत कोणताही निष्कर्ष काढणे उचित ठरत नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT