Heavy Traffic
Heavy Traffic File Photo
मुंबई/पुणे

मुंबई महानगरातील वाढत्या वाहनांच्या गर्दीचे नियोजन करा !

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई महानगरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वाहन प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सहस्त्रबुद्धे समितीने महत्वाच्या शिफारशी सुचवल्या आहे. त्यानुसार मुंबई महानगरात ट्रक टर्मिनस तयार करून, पुढची मालवाहतूक इलेक्ट्रिक वाहनाने करावी, शिवाय 10 वर्ष जुन्या वाहनांना महानगरात बंदी आणि नागरिकांनी खासगी वाहने वापरण्यास टाळून, शेअर टॅक्सी, रिक्षा मार्ग वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

महानगरातील वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे राज्य सरकारनं मुंबई महानगरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यासाठी गेल्यावर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषणाच्या कारणांवरील अभ्यासासाठी समितीची स्थापना केली होती. दरम्यान यावर्षी जून महिन्यात यासंदर्भातील अहवाल एमपीसीबीला सादर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनासह नगरविकास, वाहतूक पोलीस, परिवहन विभागांसह संबंधित विभागांना अद्याप या अहवालाच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात या आले नसल्याने अद्याप, मुंबई महानगरात वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.

MPCB च्या शिफारसी :

- ई-मोबिलिटी वर भर देत, इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत राज्य सरकारच्या वाहनांचे विद्युतीकरण करण्यासह महानगरात अवजड वाहनांवर बंदी घालून एकाच ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारण्याचे सांगण्यात आले आहे.

- 10 वर्ष जुन्या वाहनांना महानगरात बंदी घालावी.

- नागरिकांनीही खासगी वाहनांचा वापर टाळावा, शेयर रिक्षा टॅक्सीचे मार्ग वाढवावे, सिग्नल प्रणालीची दुरुस्ती करून, रस्त्यांवरील ब्रेकडाऊन झालेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यात यावी

- मुंबई महानगरासाठी पार्किंग धोरण ठरवावे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Amol Kirtikar News | अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंकडून घेतला ABफॉर्म

Today's Marathi News Live : अमित शाह एडीटेड व्हिडीओ प्रकरणी एकाला अटक

Jui Gadkari Received Threat : '... नाही तर तुला जेलमध्ये टाकेन'; जुई गडकरीला तरूणीने का दिली धमकी ?

Raveena Tandon: रविनाचा दिलकश अंदाज; साडीतील खास फोटो पाहाच!

SCROLL FOR NEXT