Pune Traffic Changes  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Alert: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल, वाचा पर्यायी मार्ग

pune traffic diversion : पुणे ग्रँड चॅलेंज टूर प्रोलॉग स्पर्धेमुळे आज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रोडसह अनेक मार्ग बंद राहतील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Traffic Update Today: पुणे ग्रँड चॅलेंज टूर प्रोलॉगसाठी शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रमुख मार्गांवर निर्बंध लावले आहेत. या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे. प्रोलॉग स्पर्धेसाठी ठरविण्यात आलेल्या मार्गांवरून वाहनांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी केले आहे.

गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), गणेशखिंड रस्ता (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता), जंगली महाराज रस्ता तसेच या मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील. स्पर्धेच्या कालावधीत हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे.वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, तसेच स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश काढण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलिस वाहने तसेच स्पर्धेशी संबंधित अधिकृत वाहने) या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी बंद राहणारे मार्ग

१ खंडोजीबाबा चौक- गरवारे पूल- गुडलक चौक

२.गुडलक चौक- संत तुकाराम महाराज पादुका चौक- ललित महल चौक- वीर चाफेकर चौक

३.वीर चाफेकर चौक- सूर्यमुखी दत्त मंदिर चौक- रेंज हिल्स जंक्शन

४.रेंज हिल्स जंक्शन- सिमला ऑफिस चौक- संचेती चौक

५.संचेती चौक- स. गो. बर्वे चौक- बालगंधर्व चौक- डेक्कन जिमखाना बस स्थानक.

पर्यायी मार्गांची व्यवस्था

स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खंडोजीबाबा चौकाकडे न जाता अण्णा भाऊ साठे चौकातून ना.सी फडके चौक, मांगीरबाबा चौक, सेनादत्त चौक, म्हात्रे पूलमार्गे जावे.

स्वारगेटकडून खडकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अण्णा भाऊ साठे चौक, पूरम चौक, बाजीराव रस्त्याने गाडगीळ पुतळा, कुंभार वेस, आरटीओ चौकमार्गे जावे.

खंडोजीबाबा चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी नळस्टॉप, पौड फाटा, आठवले चौक, विधी महाविद्यालय रस्त्याने जावे.

२.गुडलक चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी शेलारमामा चौक, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती

बापट रस्ता, विद्यापीठ चौकमार्गे जावे.

३ वाहनचालकांनी स्वारगेट, शिवाजीनगर, खडकी, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, औंध रस्ता, गणेशखिंड रस्ता आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा. काही चौकांमध्ये ‘यू-टर्न’ तसेच एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : केळी सतत काळी पडून खराब होतात? मग 'या' टिप्स वापरुन बघा

Variche Appe Recipe: सोमवारचा उपवास आहे? मग १० मिनिटांत बनवा मऊ आणि लुसलुशीत 'वरीचे अप्पे'

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

Famous Actress Wedding : लग्नघटिका समीप आली! हळद लागली, मेहंदी रंगली; प्रसिद्ध अभिनेत्रीची लगीनघाई - PHOTOS

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे १९१०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT