sharad pawar news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

Maharashtra Political News : मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का बसलाय. तिकीट कापल्याने नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री झाली.

Vishal Gangurde

ठाकरे बंधूंना शरद पवार साथ देणार

ठाकरे बंधूंसोबत शरद पवार गट जाणार असल्याने इच्छुकांची गळती

शरद पवार गटातील इच्छुक उमेदवारांची अजित पवार गटात एन्ट्री

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंचं बळ वाढवण्यासाठी शरद पवार देखील साथ देणार असल्याचे कळतंय. मुंबईत ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या युतीत शरद पवार गटाच्या वाट्याला १० जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे काही जागांवर पक्षातील जुन्या नेत्यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे मुंबईत शरद पवार गटाला गळती लागली आहे. अनेक इच्छुकांनी शरद पवारांची साथ सोडल्याचे समोर आलं आहे.

मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीत मुंबईतील शरद पवार गटाच्या काही माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं गेलं आहे. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गळती लागली आहे. यामध्ये धनंजय पिसाळ, मनीषा रहाटे,आरिफ सय्यद यांचा समावेश आहे.

शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. त्यानंतर शरद पवार गटाचे धनंजय पिसाळ यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला. धनंजय पिसाळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केला.

पिसाळ यांच्या पाठोपाठ माजी नगरसेविका मनीषा रहाटे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत असलेले नितीन देशमुख देखील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. नितीन देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात राडा घातला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT