संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी, कल्याण
MNS setback in Kalyan Dombivli municipal elections : मुंबई, ठाणे, केडीएमसीसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेय. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला ठाणे अन् मुंबई इतकेच महत्त्व प्राप्त झालेय. कारण, गेल्या काही दिवसांपासून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये राजकीय घडमोडी अन् फोडाफोडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राज ठाकरेंच्या मनसेलाही कल्याणमध्ये जोरदार धक्का बसलाय. राजू पाटील यांचे विश्वासू कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय.
मनसेचे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी मनसेचा आज राजीनामा दिला. माजी आमदार राजू पाटील यांचे समर्थक मनसे शरह अध्यक्ष कौस्तुभ देसाई,मनसेच्या माजी नगेसेविका कस्तुरी देसाई यांनी आज पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. दोन दिवसांत ते पुढील रणनिती ठरणार असल्याचे समजतेय. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी देसाई दाम्पत्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. पण आता त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा विचार केला आहे. पुढील दोन दिवसांत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.
कौस्तुभ देसाई यांचं कल्याणमध्ये मोठं प्रस्थ आहे. त्यांचा मतदारांसोबत थेट संपर्क असल्याने मनसेच्या वाढीसाठी फायदा होत होता. विधानसभेत राजू पाटील यांच्या प्रचारात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. राजू पाटील यांचे विश्वासू म्हणून देसाई यांची ओळख होती. पण त्यांनी मनसेला आता जय महाराष्ट्र केला आहे. देसाई यांनी रामराम ठोकल्याचा फटका मनसेला बसणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असतानाच हुकमी एक्क्याने राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीत याचा मनसेला फटका बसू शकतो. या घडामोडीमुळे कल्याण शहरातील मनसेच्या संघटनात्मक बांधणीला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार राजू पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कौस्तुभ देसाई हे मनसेचे शहर अध्यक्ष होते. तर कस्तुरी देसाई यांनी मनसेकडून नगरसेविका म्हणून काम केले होते. दोघांनीही पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत राजीनामा दिल्याने मनसेच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कौस्तुभ देसाई व कस्तुरी देसाई यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतरही त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राजीनाम्यानंतर बोलताना देसाई दांपत्याने पुढील राजकीय रणनिती दोन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे कल्याणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेकडून या राजीनाम्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मतदान कधी?
राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेय. आयोगाने सोमवारी राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली. कल्याण डोंबिवलीसह राज्यातील २९ महापालिकेसाठी १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होईल. तर १६ जानेवारी राजी मतमोजणी असेल. २५ तारखेपासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरूवात होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.