Pune Congress Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Congress: पुण्यात काँग्रेसला खिंडार, शिंदे गटाची ताकद वाढली; बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण घेतलं हाती

Pune Politics: पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्याने अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

Priya More

सचिन जाधव, पुणे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षांसह अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी धनुष्यबाण हाती घेतले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश केल्यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष वाहिद जावेद निलगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं. शनिवारी मुंबईमध्ये वाहिद जावेद निलगर यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर नाराज होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत होतो. मात्र वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी डावल्याने नाराज झालेल्या वाहिद जावेद निलगर यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद कमी होऊन शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता. तसंच पुण्यातील कात्रज विकास आघाडी देखील शिवसेनेत विलीन झाली. या सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये धनुष्यबाण हाती घेतले होते. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT