Santacruz Fire Saam tv
मुंबई/पुणे

Santacruz Fire: मुंबईत आगीचे सत्र सुरूच; सांताक्रुझमध्ये इमारतीला लागली भीषण आग

Santacruz Fire News: राम मंदिर परिसरातील एकमेव इंडस्ट्रियल आग लागल्याची घटना घडली. या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिमेकडील एका इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Santacruz Fire:

मुंबईत आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. काल गोरेगाव पश्चिमेकडील इमारत आणि राम मंदिर परिसरातील एकमेव इंडस्ट्रियल आग लागल्याची घटना घडली. या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिमेकडील एका इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ पश्चिमेकडील एस.वी. रोडवरील धीरज हेरिटेज या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या तळघराला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांताक्रुझ पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग लागल्याची माहिती मिळताच चार फायर इंजिन आणि एक रुग्णवाहिका, इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणत्याी प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.

काल दिवसभरात आगीच्या दोन घटना

काल दिवसभरात मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. काल गोरेगावमधील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली.गोरेगाव पश्चिमेकडील इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. गोरेगाव पश्चिमेकडील एस वी रोड परिसरातील अनमोल टॉवर या उंच इमारतीला आग लागली होती.

तसेच काल गोरेगाव पश्चिम भागात असलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली होती. याच परिसरातील गोडाऊनला ही आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमधील डिझेल गोडाऊन आणि स्क्रॅप साहित्याला ही आग लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT