पुणे: गेल्या काही काळामध्ये राज्यभरात आरोग्य भरती, पोलीस भरती (Police recruitment) आणि यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरण (TET fraud case) चांगलेच गाजले आहे. पुण्यामधील सायबर पोलिसांनी (Pune cyber police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना, टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून आता ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे.
हे देखील पहा-
अलीकडेच पुणे (Pune) सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा (TET exam) घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याबरोबरच इतर काही दलालांना अटक करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत आता पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
टीईटी घोटाळ्याविषयी पुणे सायबर पोलिसांकडून ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेत 12 अधिकाऱ्याच्या मदतीने ही तपासणी केली जात आहे. ओएमआर शीट तपासणीमधून या घोटाळ्याची व्याप्ती आणखीच वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे येत्या काळात या प्रकरणी अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसाअगोदर महाराष्ट्रामध्ये आरोग्य भरतीच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पुणे सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. दरम्यान टीईटी परीक्षा पेपर मध्येही गैरप्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. तेच धारेदोरे पकडून पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये अनेक मोठे- मोठे मासे हाती लागले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचा देखील समावेश होता. यावेळी पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त करण्यात आली होती.
Edited By- Digamnbar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.