Nagpur: सैनिक प्रशिक्षण केंद्रात सैनिकाची गळफास लावून आत्महत्या
Nagpur: सैनिक प्रशिक्षण केंद्रात सैनिकाची गळफास लावून आत्महत्याSaam Tv

Nagpur: सैनिक प्रशिक्षण केंद्रात सैनिकाची गळफास लावून आत्महत्या

नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीमधील कामठी- कन्हान मार्गावरील ऑफिसर मेस परिसरामध्ये सैनिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

नागपूर: नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीमधील कामठी- कन्हान मार्गावरील ऑफिसर मेस परिसरामध्ये सैनिकाने (Soldiers) गळफास लावून आत्महत्या (self-slaughter) केल्याची धक्कादायक घटना सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. विवेककुमार अखीलेश राय (वय-२७) असे मृत सैनिकाचे नाव आहे. (soldier commits self slaughter by hanging soldier training center)

हे देखील पहा-

नवीन कामठी पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार कामठी (Kamathi) येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील ४१४ कन्टोनमेंट ऑफिसर मेस परिसरात ६ महिन्यांपूर्वी सैनिक प्रशिक्षणाकरिता (Training) आलेले विवेककुमार अखिलेश राय (२७, बोरबायस, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) याने आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास ऑफिसर मेस परिसरात कडूलिंबाच्या झाडाला नायलॉन दोराने गळफास लावल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात दिसून आली आहे. लगेच इतर सैनिकांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून कामठी उपजिल्हा रुग्णालयात (hospital) उपचाराकरिता पाठविण्यात आला आहे. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे.

Nagpur: सैनिक प्रशिक्षण केंद्रात सैनिकाची गळफास लावून आत्महत्या
जामगावचा उपसरपंचावर राजीनामा देण्यासाठी हल्ला; जीवे मारण्याची धमकी

या घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस (police) ठाण्यात दिली असता दुय्यम पोलिस निरीक्षक मंगेश काळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप कुमरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नवीन कामठी पोलिस ठाण्याला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दिलीप ठोंबरे करत आहेत. आत्महत्येचे कारण कळले नसून सैनिकाच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृत सैनिकाचे परिवारातील सदस्य आल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com