पुणे: तू नीलेश सुर्वे आणि योगेश ठोंबरे यांच्या नादी लागतो का? उपसरपंच (Sarpanch) पदाचा राजीनामा दे, असे धमकावत ४ अज्ञातांनी मुळशी तालुक्यातील जामगावचे उपसरपंच विनोद वसंत सुर्वे (वय- ३८) यांना जीवे मारण्याची धमकी (threat) देत त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना काल (ता. 22 जानेवारी) सायंकाळी दारवली रस्त्यावर घडली आहे. (Jamgaon's Deputy Sarpanch Vinod Surve threatened to kill)
हे देखील पहा-
जामगावचे उपसरपंच असलेले विनोद सुर्वे यांची वाकड येथे कंपनी आहे. ते शनिवारी जामगावहून वाकडला घराच्या दिशेने आपल्या इनोव्हा गाडीतून (एमएच १२; टीएन ३५०३) जात होते. त्यांची मोटार शेखर धोंडीबा गोपालघरे हे चालवत होते. तोंडाला कापड गुंडाळलेल्या अज्ञात ४ व्यक्तींनी त्यांची गाडी दारवली गावच्या पुढे ओढ्याजवळ अडविण्यात आली होती. त्यामधील एकजण चालकाच्या बाजूला, तर इतर तिघेजण सुर्वे बसलेल्या बाजूकडे गेले. त्यांच्या हातात कोयता होता.
त्यांनी सुर्वे यांना शिवीगाळ करत ‘तू नीलेश सुर्वे, योगेश ठोंबरे यांच्या नादाला लागतो का, उपसरपंचपदाचा राजीनामा दे, हा तुला शेवटचा चान्स आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यात एकाने रस्त्यावरील दगड उचलून सुर्वे बसले होते, त्या बाजूला गाडीच्या काचेवर फेकला. त्यात गाडीची काच फुटली. परिस्थितीचे गांभीर्य बघून सुर्वे यांनी गाडी चालू करत तिथून पळ काढला आहे. यानंतर पौड पोलिस ठाण्यात जावून नीलेश दत्तात्रेय सुर्वे, योगेश लक्ष्मण ठोंबरे यांच्यासह ४ अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
सुर्वे यांना उपसरपंचपदाचा राजीनामा द्यावा, याकरिता गेली ३-४ महिन्यांपासून धमकी दिली जात आहे. याअगोदर ८ ऑक्टोबर दिवशी दारवलीच्या हद्दीमध्ये सुर्वे यांच्या फॉर्च्युनर गाडीवर देखील असाच हल्ला झाला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याची गाडी (एमएच १२; एमएफ१६०४) अडवून लाकडी दांडक्याने काच फोडण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी नीलेश सुर्वे आणि त्यांचे मामा सुनील ठोंबरे यांना मारहाण करत आरोपी पळून गेले होते. त्यावेळी देखील सुर्वे यांच्या फिर्यादीवरून विनोद सुर्वे आणि ३ अज्ञातांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.