Mumbai: कांदिवलीत मोठी दुर्घटना; टँकमध्ये पडून 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू @AHindinews
मुंबई/पुणे

Mumbai: कांदिवलीत मोठी दुर्घटना; टँकमध्ये पडून 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू

मुंबईमधील कांदिवली (Kandivali) भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईमधील (Mumbai) कांदिवली (Kandivali) भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या ३ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सेप्टिक टँकमध्ये (tank) पडून गुदमरून मृत्यू झाला आहे. कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. (major accident in mumbai kandivali 3 sanitation workers fell in tank died)

हे देखील पहा-

मुंबई महानगरपालिका (BMC) नुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन (Fire brigade) दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना शताब्दी रुग्णालयात (hospital) पाठविण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. माजी स्थानिक नगरसेवक (Corporator) कमलेश यादव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्वच्छतागृहाला आजूबाजूने झोपडपट्टीने वेढले आहे.

सेप्टिक टँकमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार लोक नेहमी करत होते. समुदाय- आधारित संस्थेमधील कोणीतरी या समस्येचे निरीक्षण करण्यासाठी एजन्सीला कॉल केला होता. एजन्सीने ३ कामगारांना पाठवले होते, त्यांनी झाकण उघडले आणि एका कामगाराने खाली वाकून तपासणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक कामगार टाकीत घसरला आणि त्याला मदत करण्यासाठी इतर कामगार सुद्धा टाकीत उतरले होते. यामुळे ही दुर्घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

SCROLL FOR NEXT