mahayuti political news : Saam tv
मुंबई/पुणे

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

mahayuti political news : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणारल असल्याची माहिती मिळतेय.

Saam Tv

निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू

भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळलाय

शिंदे सेना भाजपविरोधात तक्रार दाखल करणार

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळून आलाय. शिंदेसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर शिंदेसेना उद्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महायुतीतील संघर्ष अधिक चिघळताना दिसत आहे.

शिंदेसेनेचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकरांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या स्थानिक टोळीमुळेच आपला पराभव झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी थेट संबंधितांची बरखास्ती करण्याची मागणी केलीये. सरवणकर यांनी प्रभाग क्रमांक १९४ मधून निवडणूक लढवली होती. त्याच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदेंनी त्यांचा पराभव केलाय. तसेच सरवणकरांची बहीण प्रिया सरवणकर-गुरव यांनाही प्रभाग क्रमांक १९१ मधून पराभव स्वीकारावा लागलाय. त्यांचा पराभव ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांनी केलाय

या आरोपांना मुंबई भाजपच्या दक्षिण-मध्य विभागाच्या महासचिव अक्षता तेंडुलकरांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे वॉर्ड १९१ मधील मतदानाची आकडेवारी मांडत आरोप फेटाळलेत. 'भाजपला मानणाऱ्या बूथमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेली मते आणि शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहता आरोपांचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी केला आहे. 'खोटं बोला, पण रेटून बोला, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

तेंडुलकरांनी वाडेकर यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. या पोस्टमध्ये ‘प्रिया यांना पाडायचंय, आपल्याला तिकडून मिळालेत,’ असा मजकूर असलेला व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट असल्याचं पाहायला मिळतोय. भाजपची बदनामी करण्यासाठी खोटे संदेश ठरवून पसरवले जात असल्याचा आरोप तेंडुलकरांनी केलाय.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात अधिकृत तक्रार सायबर क्राइमकडे तक्रार दाखल करणार आहेत. भाजपची बदनामी करण्यासाठी खोटे मेसेज फ्रेम करण्यात आलेत. बदनामी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याची सखोल चौकशी व्हावी, असे तेंडुलकरांनी स्पष्ट केलंय.

'खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत. सत्य लवकरच सर्वांच्या समोर येईल, असेही त्यांनी म्हटलं आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद उघडपणे समोर आलाय. आगामी सत्ता स्थापनेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

अमेरिकेचा हेकेखोरपणा, जगात युद्ध भडकणार? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती काय? VIDEO

SCROLL FOR NEXT