Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठरलं! देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासहित एकनाथ शिंदेही शपथ घेणार; सोहळ्यात लाडक्या बहिणींसाठी खास आसनव्यवस्था

Maharashtra Political News : महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते शपथ घेणार आहेत. या सोहळऱ्यात लाडक्या बहिणींसाठी खास आसनव्यवस्था असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महायुती सरकारचा मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेणार आहेत. यंदाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला जाणार आहे. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मजल मारली. या निवडणुकीत महायुतीने २३० जागा जिंकल्या. महायुतीमधील भाजपने १३२ जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. या निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीने महाविकास आघाडीला ४६ जागांवर रोखलं. महाविकास आघाडीला ५० आकडाही गाठता आला नाही. विधानसभेच्या निकालानंतर ११ दिवसांनी खातेवाटपाचा पेच सुटला.

या शपथविधीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ असल्याचं निश्चित झालं आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्र्यांसोबत इतर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वाचं विशेष लक्ष असणार आहे. या सोहळ्याला इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांची देखील हजेरी असणार आहे. त्यामुळे या शपथविधीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात भगवा रंग आकर्षणाचा मुद्दा ठरला आहे. शपथविधी सोहळ्याला बांधण्यात आलेल्या तीनही पंडालचे कापड भगवे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि भगवा रंग याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या शपथविधी सोहळ्याला वेगवेगळ्या मान्यवरांची हजेरी पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याला राज्यातील विविध भागातील लाडक्या बहिणी देखील हजेरी लावणार आहेत. सर्व महिला या भगव्या रंगाच्या साड्या परिधान करुन शपथविधी सोहळ्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

SCROLL FOR NEXT