Sachin Ahir  Saam TV
मुंबई/पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी? सचिन अहिर म्हणतात...

निवडणुकांचा फॉर्म्युला काय असेल हे विचारले असता ते म्हणाले फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.

सुमित सावंत

पुणे: राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचे (Muncipal Corporation Election) बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरु केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महापालिकांमध्ये महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने (NCP) शिवसेनेबरोबर (Shivsena) युती करण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला राष्ट्रवादीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यासंदर्भात निर्णय घेतील आणि घोषित करतील असे शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले आहेत.

निवडणुकांचा फॉर्म्युला काय असेल हे विचारले असता ते म्हणाले फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. कोल्हापूर पोट-निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटलांनी उपस्थीत राहायला पाहिजे होते. परंतु त्यांना कोल्हापूर वरुन पुण्याला स्थलांतरीत व्हावं लागलं असा टोमणाही अहिर यांनी चंद्रकांत पाटीलांना लगावला आहे. मी राष्ट्रवादी पक्षात काम करत होतो आणि शिवसेनेत आलो त्यामुळे माझा जनसंपर्क वाढला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मी दुवा बनलो आहे. मी कुठलीही तोडण्याची भूमिका घेतलेली नाही त्यामुळे महाविकासआघाडी झाल्यामुळे त्याचा फायदा अधिक होत आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही काम करत असल्याचं सचिन अहिर म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT