'महाविकास आघाडीने शिवसेनेला फसवण्याचं काम केलं आहे' SaamTV
मुंबई/पुणे

'महाविकास आघाडीने शिवसेनेला फसवण्याचं काम केलं आहे'

'शिवसेनेचा मुख्यमंत्री (Shivsena CM) असतानाही शिवसेनेला अकोल्यात उमेदवार निवडून आणता आला नाही; शिवसेनेला उघड्यावर पाडल्याचे आजच्या निकालावरुन दिसून आले.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : नागपूर आणि अकोला निवडणुकांमध्ये (Nagpur and Akola Elections) भाजपला यश मिळाल्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला अकोल्यात उमेदवार निवडून आणता आला नाही अशी टीका दरेकर यांनी केली आहे. (Mahavikas Aghadi has worked to deceive Shivsena)

हे देखील पहा -

साम टीव्हीशी (Saam TV ) बोलताना दरेकर म्हणाले, 'विदर्भात भाजपला जनाधार आहे. तसेच आजच्या निवडणुकीमुळे या सरकारमध्ये विसंवाद असल्याचं दिसून येत आहे. विदर्भ हा भाजपच्या सोबत राहिलेला आहे. तसंच काँग्रेसची मते फुटलेली आहेत. नाना पटोले यांची एकाधिकारशाही यावेळी दिसली असून राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असताना देखील अकोला शिवसेनेला टिकवता आलेला नाही अशी प्रतिक्रीया प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) दिली.

शिवसेनेचा काऊंटडाऊन सुरू -

दरम्यान शिक्षक मतदारसंघ देखील शिवसेनेच्या हातून गेला शिवसेनेला फसवण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. शिवसेनेला उघड्यावर पाडल्याचे यावरून दिसते या तिन्ही पक्षात आलबेल नाही. काँग्रेस पक्षाचा उमेदवार असताना यांना ऐनवेळी बदलावा लागला केवळ तीन पक्षात विसंवाद नाही तर यांच्या पक्षापक्षात देखील विसंवाद आहे असही ते यावेळी म्हणाले.

तसंच तिन्ही पक्ष सत्तेत असले तरी जनता भाजपच्या सोबत आहे हे आजच्या निकालांवरुन दिसते. नागपुरची जागा प्रचंड मतांनी जिंकली. अकोल्याची शिवसेनेची जागा भाजपने (BJP) जिंकली, महाविकास आघाडीची क्षमता नाही आजही राज्यातील जनता भाजपच्या मागे असून आता शिवसेनेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे असही ते म्हणाले.

पटोलेंनी राजीनामा द्यावा -

नाना पटोले (Nana Patole) हे काँग्रेसचे नेतृत्व करतात. या पराभावाची नैतिक जबाबदारी नाना यांनी स्वीकारून रानीनामा द्यावा अशी मागणी आता काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे घोडेबाजार नाना तुम्ही केला. आम्ही आमचे नगरसेवक बाहेर ठेवणे यात गैर काय? असा सवाल करत त्यांनी पटोलेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT